पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) – औद्योगिक क्षेत्रातील दर्जेदार उत्पादन व ग्राहकविश्वासाच्या बळावर अल्पावधीत यशाची घोडदौड करणाऱ्या लुब्रॉल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचा १० वा वर्धापन दिन १ जुलै २०२५ रोजी जल्लोषात साजरा करण्यात आला.
या विशेष सोहळ्याला JSPM Group of Institutesचे कार्यकारी संचालक अनिल भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी लुब्रॉलच्या सुरुवातीच्या वाटचालीच्या आठवणींना उजाळा देत संस्थेच्या यशस्वी प्रवासाचा गौरव केला. "लुब्रॉलचा IPO जाहीर झाला की मला सर्वात आधी सांगा – मी तो घेणारच!" अशा आत्मीय आणि उत्स्फूर्त प्रतिक्रियेमुळे उपस्थितांमध्ये विशेष ऊर्जा संचारली.
कार्यक्रमाला लुब्रॉलचे फायनान्शियल अँडव्हायझर सचिन अभंग, तसेच दीर्घकालीन ग्राहक व पुणे हीटचे मालक परमानंद हुरडुळे यांचीही मान्यवर उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे नियोजन, समन्वय व सूत्रसंचालन लुब्रॉलच्या कोअर टीमने अत्यंत प्रभावी पद्धतीने पार पाडले. या टीममध्ये पुढील सदस्यांचा विशेष सहभाग होता:
- श्रीमती अशा गरुड (मॅनेजर)
- श्रीमती अशा आहेर (वरिष्ठ लेखापाल)
- देवांश कुँवर (HR प्रमुख)
- सुनिता आकाश काळे (डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह)
- मोनिका कंठाळे (कार्यक्रमाचे आकर्षण)
- सहाय्यक टीम: तृप्ती जाधव, श्वेता शिंदे, अमृता पवार, रुपेश देशपांडे (खरेदी प्रमुख)
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अँकर निरंजन कुलकर्णी यांनी आपल्या उत्साही व प्रभावी निवेदनशैलीत केले. त्यांच्या शब्दसौंदर्य व उर्जेने सभागृह भारावून गेले.
कार्यक्रमातील एक विशेष क्षण म्हणजे कंपनीचे ऑपरेशन्स डायरेक्टर भरत जगताप यांनी सर्व मान्यवरांना तुळशीचे रोप आणि सन्मानपत्र प्रदान करून सन्मान केला. त्यांनी "पर्यावरण, कृतज्ञता आणि निरंतर वाढ" या मूल्यांचे सुंदर प्रतीक या निमित्ताने साकारले.
लुब्रॉलच्या स्थापनेपासून सातत्याने साथ देणाऱ्या पहिल्या दहा ग्राहक, पुरवठादार व मान्यवर यांचा सन्मान सोहळ्याचा मुख्य भाग ठरला. यामध्ये पुढील मान्यवरांचा समावेश होता:
- रोहिदास मोहिते
- राहुल चौबे
- राहुल ठाकरे
- दीपक गडसिंग
- अशोक लोहाकरे
- कशिनाथ लोहार
- ध्यानेश्वर जाधव
- अप्पासाहेब चव्हाण
- सतीश पाटील
- विघाते सर, चंद्रकांत मोहिते
त्यांना Achievement Award देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमात लुब्रॉलचे CEO जोतीराम जगताप यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या आगामी योजनांचा आढावा सादर केला. "येणाऱ्या वर्षभरात लुब्रॉलचा IPO आणण्याचे लक्ष्य आहे आणि दिल्लीमध्ये नवीन उत्पादन युनिटच्या उभारणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत," असे त्यांनी जाहीर केले.
कार्यक्रमाच्या समारोपाला ऑनलाईन विपणन अधिकारी सुनिता आकाश काळे यांनी वोट ऑफ थँक्स दिला. त्यांनी संपूर्ण ग्राहकवर्ग, पुरवठादार, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मनःपूर्वक आभार मानून, सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या दिमाखदार सोहळ्याने लुब्रॉल इंडस्ट्रीजच्या यशस्वी दशकाला सलाम केला आणि पुढील प्रगतीसाठी प्रेरणेचे दालन खुले केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा