Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २८ जुलै, २०२५

चिमठाणे गावातील भूमिपुत्र (सोनू फौजी) यांच्या देशसेवा निवृती निमित्त चिमठाणे परिसरातील दहावी बारावीत प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थीचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न.....



शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील श्री महेंद्र गोकुळ पाटील ( सोनू फौजी)* यांच्या देश सेवा निवृत्त निमित्त आज दि 27 रोजी गागेश्वर महादेव मंदिर येथे 10 वी 12वी प्रथम, द्वितीय,तृतीय क्रमांक मिळून प्राविण्य मिळवून आलेल्या सर्व चिमठाणे परिसरातील विद्यार्थीना ट्रॅफि व प्रमाणपत्र व तसेच सत्कार करून गौरव करण्यात आला. एकूण पस्तीस ट्रॉफींचे वाटप करण्यात आले. 

या कार्यक्रम च्या अध्यक्ष स्थानी चिमठाणे गटाचे मा.जि.प.सदस्य महेंद्र गिरासे, याच्या हस्ते सरस्वती मातेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमला सुरवात करण्यात आली. यावेळी श्री महेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थी कसा असावा याबद्दल मनोगत व्यक्त केले.व विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .तसेच त्यानंतर विद्यार्थ्यांना ट्रॅफि प्रशस्तीपत्र वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला उपस्थित मा. उपसभापती श्री दरबारसिंग गिरासे, धुळे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य डॉ.भरत पारसिंग राजपूत, मा.उपसरपंच नरेंद्र विनायक पाटील,चिमठाणे गावचे माजी उपसरपंच दिलीपसिंग गिरासे, शिंदखेडा प.स.माजी सभापती डॉ दीपक बोरसे,सामाजिक कार्यकर्ते श्री शानाभाऊ धनगर , दूध डेअरी चे चेअरमन श्री दिलीप धनगर ,अनिल पाटील,मा. उपसरपंच सुनील गागरे, आरावे गावचे माजी सरपंच ईश्वर सभु आखाडे, माजी रेल्वे पोलीस सत्तर तात्या गिरासे ,भटू माळी, कोमल गिरासे ,देवराम पाटील, शिंदखेडा ITI Govt कॉलेज चे प्राचार्य भागवत डिगराळे सर चिमठाणे दिपप्रभा ITI कॉलेजचे प्राचार्य नितीन गिरासे सर, उमेश कोळपकर सर कपिल गिरासे,मोनू पाटील, विकास गिरासे,दिनेश चौधरी पत्रकार प्रवीण भोई ,पत्रकार अविनाश वाडीले. तसेच शिंदखेडा तालुका खानदेश रक्षक ग्रुप चिमठाणे येथील संतोषी माता मित्र मंडळ याचे देखील सहकार्य कार्यक्रमाला लाभले इ.उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध