Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २७ जुलै, २०२५

शाळेची मोडकळीस आलेली इमारत अखेर रात्री कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली



शिरपूर तालुक्यातील तोदे गावातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या जिल्हा परिषद शाळेची इमारत सतत पाऊस चालू असल्याकारणाने अखेर रात्री अचानक कोसळली.सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.


संबंधित शाळा गेल्या काही वर्षांपासून बंद होती आणि इमारतीची अवस्था धोकादायक झाली होती.स्थानिक ग्रामस्थांनी अनेकदा ही इमारत पाडून टाकण्याची मागणी ग्रामपंचायती कडे केली होती.मात्र, ती मागणी वेळेत मान्य करण्यात आली नव्हती. शेवटी ही इमारत सततच्या पावसामुळे काल रात्री अचानक कोसळली.

या घटनेमुळे आदिवासी वस्तीकडे जाणारा मुख्य रस्ता काही काळासाठी बंद झाला होता. मात्र ग्रामपंचायतीच्या तत्परतेने कारवाई करत रस्ता मोकळा केला असून वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध