Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २८ जुलै, २०२५
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची संवाद बैठक बेलपाडा येथे संपन्न...!
बेलपाडा,दि.२७ : राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे उरण तालुका संघटक अलंकार कडू यांच्या वाढदिवसाच्या निमित्त राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची संवाद बैठक पनवेल तालुक्यातील बेलपाडा येथे संपन्न झाली. आणि अलंकार कडू (रा. रांजणपाडा) यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी या कार्यक्रमासाठी संस्थापक/अध्यक्ष मा.श्री.विजय सूर्यवंशी साहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री.बाळासाहेब अडांगळे,अन्याय अत्याचार निवारण समितीचे राज्य सचिव श्री प्रितमसिंग चौहान, रायगड जिल्हा अध्यक्ष मा. धनाजी पुदाले, सचिव मा. राजपाल शेगोकार, कार्याध्यक्ष.सचिन गायकवाड, उरण तालुका अध्यक्ष मा.कांतीलाल पाटील, उरण तालुका कार्यध्यक्ष प्रविण नाईक, रायगड जिल्हा अन्याय अत्याचार निवारण समितीचे अध्यक्ष सौ. अश्विनी ठाकूर तसेच रायगड जिल्ह्यातील पत्रकार व पदाधिकारी व ठाण्यातील पत्रकार व पदाधिकारी व मुंबईचे पत्रकार व पदाधिकारी महिला उपस्थित होते.
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे उरण तालुका संघटक अलंकार कडू (रा. रांजणपाडा) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
पत्रकार कांतीलाल पाटील- जासई (उरण)
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा