Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, ७ जुलै, २०२५
भूमिपूत्र आमदार तथा माजी मंत्री श्री अनिलदादा पाटिल यांचा आज वाढदिवस विशेष
अमळनेर (वाढदिवस विशेष) : नुकतेच पाडळसरे धरणास मिळालेली उच्चस्तरीय मंजुरी ही तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी परिवर्तनाची नांदी ठरली आहे. यामुळे सिंचन सुविधांना नवी दिशा मिळणार असून, शेतीत समृद्धी येणार आहे.त्यामुळे तालुक्याने त्यांना पाणीदार आमदार संबोधले आहे, अंमळनेर 24 तास पाणी पुरवठा योजना शहराला संजिवणी ठरणार आहे
"
आमदार अनिल पाटील हे
"आपण समाजाचे देणे लागतो" या उदात्त तत्त्वाने प्रेरित होऊन अमळनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत झटत आहेत, आमदार तथा माजी मंत्री अनिलदादा पाटील हे आज तालुक्याच्या जनतेसाठी विश्वास, विकास आणि नेतृत्वाचे प्रतीक बनले आहेत. त्यांच्या आज 7 जुलै वाढदिवसानिमित्त गावागावातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दादांच्या कार्यकाळात अमळनेर शहर आणि तालुक्याच्या विकासात अभूतपूर्व प्रगती झाली आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, कृषी, सिंचन, क्रीडा आणि सांस्कृतिक सुविधांमध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
अमळनेर बदलतोय" हे स्वप्न आता वास्तवात उतरत आहे. शहरामध्ये जलसंपदा विकास, दर्जेदार रस्ते, नवे शैक्षणिक व आरोग्य प्रकल्प तर ग्रामीण भागात पायाभूत सुविधांचा झपाट्याने विस्तार झाला आहे. सामाजिक न्याय, ग्रामीण उत्थान आणि शेतकरी कल्याणासाठी त्यांनी घेतलेले निर्णय जनतेच्या मनात घर करून गेले आहेत. त्यांची लोकसंग्राहक शैली, अभ्यासू दृष्टिकोन आणि विकासाभिमुख निर्णय अमळनेरच्या परिवर्तनाची ग्वाही देतात.
त्यांच्या या कार्यात त्यांच्या पत्नी, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई पाटील, यांचाही सक्रिय सहभाग असून, त्यादेखील शहराच्या प्रगतीसाठी अहोरात्र कार्यरत आहेत.
या सर्व प्रवासात साथ देणाऱ्या तमाम अमळनेरकर जनतेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद!
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बेटावद प्रतिनिधी:- शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथे आषाढी एकादशीच्या शुभदिनी बेटावद येथील माळी वाडा परिसरातील विठ्ठल मंदिरात पारंपरिक भक्तिभ...
-
बेटावद प्रतिनिधी : दिनांक 5 जुलै 2025 रोजी रात्री 1:45 वाजेच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नरडाणा ग्र...
-
धुळे प्रतिनिधी :- "शिक्षणाचे मंदिर" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाळेत प्रसूती रजा मंजूर करण्यासाठी लाच मागणाऱ्या मुख्याध्यापिका आणि ...
-
अमळनेर (वाढदिवस विशेष) : नुकतेच पाडळसरे धरणास मिळालेली उच्चस्तरीय मंजुरी ही तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी परिवर्तनाची नांदी ठरली आहे. यामुळे सिं...
-
नरडाणा पोलीस ठाण्याच्या कारवाईत वाहनांच्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास अटक करून तब्बल २७ बॅटऱ्या आणि चोरीची अॅक्टीवा स्कुटी असा एक...
-
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील 119 ग्रामपंचायतीच्या 2025 ते 2030 या कालावधीसाठी सरपंचपदाचे आरक्षण सोडत दिनांक 8 जुलै रोजी काढण्यात येणार आहे...
-
नेत्याचा वाढदिवस आगळा वेगळा साजरा करण्याचा बाजार समितीचे संचालक सचिन पाटील यांचा मानस अमळनेर : भूमिपुत्र आमदार अनिल पाटील या ...
-
मानवाच्या ज्याप्रमाणे अन्न,वस्त्र व निवारा ह्या तीन मूलभूत गरजा आहेत,त्याचप्रमाणे शिक्षण सुद्धा चौथी मूलभूत गरज बनलेली असल्याने शेवटी जो शिक...
-
शिंदखेडा तालुक्यातील दहिवेल (ता. शिंदखेडा) येथे घडलेली एक घटना अपघात असल्याचे प्रथमदर्शनी भासवत असली, तरी नरडाणा पोलिसांनी तपासाचा धागा पकडत...
-
शिंदखेडा तालुक्यातील बेटावद गावात वडार वाडा परिसरात अवैध गावठी दारू अड्ड्यावर नरडाणा पोलिसांनी सोमवारी सकाळी छापा टाकत मोठी कारवाई केली. या ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा