Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ६ जुलै, २०२५

DEF युरिया च्या काळाबाजारावर नरडाणा पोलिसांची कारवाई – लाखोंचा मुद्देमाल जप्त..!



बेटावद प्रतिनिधी : दिनांक 5 जुलै 2025 रोजी रात्री 1:45 वाजेच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नरडाणा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीत


पथकाने मोठी कारवाई केली. मुंबई-आग्रा महामार्गावरील नरडाणा पुलाजवळ एका पिकअप वाहनातून DEF युरिया डिझेल फ्लुइड (डिझेल एक्झॉस्ट फ्लुइड) चा साठा आढळून आला असून यामध्ये ७० कॅन (बॅरल) वेगवेगळ्या कंपन्यांचे DEF युरिया साठवलेले आढळले. अंदाजे २००० लिटर इतका हा साठा होता.

सदर मुद्देमाल बेकायदेशीरपणे वाहून नेला जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून वाहन क्रमांक MH 47 Y 0486 ला अडवले.त्या वेळेस वाहन चालक व त्याच्या साथीदार यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांच्या कडे अधिकृत कागदपत्रे मिळून आली नाहीत त्यामध्ये सुमारे ₹6,53700 रुपये किमतीचा DEF युरिया, २००० लिटर क्षमतेचा प्लास्टिकचा टाकी, व टाटा कंपनीची पिकअप गाडी असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

DEF युरिया विविध कंपन्यांचे असून खालीलप्रमाणे आहे:

TATA MOTORS DIESEL EXHAUST FLUID – २० लिटरचे ३० कॅन

GULF AL – Approved by ASHOK LEYLAND – २० लिटरचे २० कॅन

EICHER Genuine Lubricants MILE MAX DIESEL EXHAUST FLUID – २० लिटरचे २० कॅन

सदर वाहन चालक व संबंधितांविरोधात कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ भादंवि तसेच मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.

ही कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत ढिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री.किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर विभाग शिरपूर सुनील गोसावी, यांच्या मार्गदर्शनाखाली नरडाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे स. पो.नि.निलेश मोरे,पो उप निरीक्षक रवींद्र महाले, ललित पाटील, विक्रांत देसले,गणेश पाटील, सुरज सावळे,अर्पण मोरे दिपक भामरे यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध