Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २ ऑगस्ट, २०२५

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) किसान सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष हर्षल ठाकरे यांच्या मागणीला यश – दहिवेल येथील खासगी कृषी बाजार समितीने शेतकऱ्यांकडून घेतले जाणारे हमाली शुल्क रद्द



शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणारे प्रतिक्विंटल 9 रुपये 81 पैसे हमाली शुल्क पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
हा निर्णय शेतकरी संघटनांचा, कृषी हितग्राहींचा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) च्या किसान सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष हर्षल दगाजी ठाकरे यांचा पाठपुरावा आणि प्रयत्न फळाला आल्याचे ठरत आहे.
यापूर्वी या बाजार समितीकडून शेतकऱ्यांकडून बेकायदेशीररित्या हमाली शुल्क घेतले जात होते,जे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या 03 एप्रिल 2023 रोजीच्या आदेशाच्या विरोधात होते.
या विरोधात जोरदार निवेदने देण्यात आली, संबंधित बाजारांवर प्रशासकीय दबाव निर्माण करण्यात आला. अखेर प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी लक्ष दिल्यानंतर बाजार समितीने ही शुल्कवसुली थांबवण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयामुळे शेकडो शेतकऱ्यांना थेट आर्थिक दिलासा मिळणार असून इतर खाजगी बाजारांनाही आता न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे लागणार आहे.
श्री.हर्षल ठाकरे यांनी सांगितले की,"हा विजय फक्त माझा नाही,तर प्रत्येक त्या शेतकऱ्याचा आहे, ज्याने अन्यायाविरुद्ध आवाज उठवला.आता उर्वरित खाजगी बाजार देखील न्यायालयाच्या आदेशाचे पालन करतात की नाही, याकडे आम्ही लक्ष ठेवणार आहोत."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध