Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, २१ जुलै, २०२५
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्यातील काटवानचे नेते राजधर देसले (माऊली) यंदा जिल्हा परिषद निवडणूक लढविणार
साक्री तालुक्यातील काटवानचे नेते राजधर देसले (माऊली) यंदा जिल्हा परिषद निवडणूक लढविणार
साक्री तालुक्यातील काटवान परिसरात राजधर देसले माऊली नावाचा झंझावाती कारकीर्द नव्या गट रचनेनंतर म्हसदी किंवा दात्तर्ती गटातून रणशिंग फुंकणार असल्याचे बोलले जात आहे. साक्री तालुक्यातील म्हसदी किंवा दातर्ती गटातून नव्याने झालेल्या गट रचनेनंतर श्री राजधर देसले यांनी राजकीय रणभूमीत आपले रणशिंग मोठ्या आत्मविश्वासाने फुंकले असून,काटवान परिसरात त्यांचा प्रभाव आणि नेतृत्वक्षमता ठळकपणे दिसून येत आहे. माऊली हे केवळ राजकीय नेते नसून, सामाजिक आणि शैक्षणिक कृषी आरोग्य क्षेत्रातील एक प्रभावी कार्यकर्ता म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख आहे. राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच,धुळे जिल्हा शिवसेना जिल्हा अध्यक्ष डॉ. तुळशीराम गावित व विध्यमान आमदार ताईसो मंजुळा गावित यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी व खंदे समर्थक म्हणुन ओळखले जातात.श्री राजधर देसले माऊली यांनी गेल्या अनेक वर्षांपासून काटवान व परिसरातील गोरगरीब, उपेक्षित आणि वंचित घटकांसाठी अविरत कार्य केले आहे.
सद्या त्यांचा पत्नी संगीता देसले या विध्यमान साक्री पंचायत समिती सदस्य आहेत.माऊली चा सतत काम करण्याचा वृत्तीमुळे ते काटवानचे माऊली म्हणुन ओळखले जातात कृषी क्षेत्रातील मदत,आरोग्य सुविधा,
सामाजिक समस्या सोडविणे प्रत्येक ठिकाणी त्यांची उपस्थिती व सक्रिय सहभाग नोंदवणे सुखदुःखात रात्र पहाटे धावून जाणे.ही माऊलींच्या प्राथमिकता असते अत्यंत मितभाष म्हसदी सारख्या मोट्या गावात दांडगा जनसंपर्क ककानी भडगाव,राजबाई शेवाळी,या गावांवर असणारी पकड त्यांची जमेची बाजू आहे नव्या गट रचनेच्या पार्श्वभूमीवर जनतेत असलेली त्यांची लोकप्रियता, कार्यकर्त्यांचे निष्ठावान समर्थन आणि सेवाभावी वृत्ती या बळावर त्यांनी आपले राजकीय बस्तान मजबूत केलेले दिसते आहे.
काटवान परिसरात त्यांच्या कार्याने विशिष्ट छाप पाडली असून,येत्या काळात त्यांच्या नेतृत्वाकडे आशेने आणि विश्वासाने पाहिले जात आहे. राजधर देसले माऊली यांची झंझावाती कारकीर्द ही केवळ राजकारणापुरती मर्यादित न राहता, लोकसेवेचा नवा आदर्श म्हणून पुढे येत आहे. त्यांच्या कार्यपद्धतीतून एक प्रेरणादायी नेतृत्व विकसित होत असून, आगामी काळात त्यांचा प्रभाव आणखी बळकट होईल,असे संकेत राजकीय वर्तुळातून मिळत आहेत हे सध्या शिवसेने कडून दातर्ती किंवा म्हसदी गटातून लढण्यास इच्छुक आहेत.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नांदेड (प्रतिनिधी)– महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातील ऐतिहासिक व आध्यात्मिक ऋणानुबंध अधिक बळकट करणारी 'संत नामदेव घुमान यात्रा' यंदा १...
-
शिरपूर/ प्रतिनिधी शासनाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यास उच्च न्यायालयाने प्रतिबंध घातला असताना त्या आदेश...
-
साक्री तालुक्यातील काटवान परिसरात राजधर देसले माऊली नावाचा झंझावाती कारकीर्द नव्या गट रचनेनंतर म्हसदी किंवा दात्तर्ती गटातून रणशिंग फुंकणार...
-
अमळनेर (वाढदिवस विशेष) : नुकतेच पाडळसरे धरणास मिळालेली उच्चस्तरीय मंजुरी ही तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी परिवर्तनाची नांदी ठरली आहे. यामुळे सिं...
-
बेटावद प्रतिनिधी:- शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथे आषाढी एकादशीच्या शुभदिनी बेटावद येथील माळी वाडा परिसरातील विठ्ठल मंदिरात पारंपरिक भक्तिभ...
-
कायद्याचा अभ्यास हा निरंतर चालत असतो आणि अवचित काही महत्वाचे न्यायनिर्णय अचानकपणे समोर येतात. ह्यापूर्वी सहकारी सोसायट्यांना / संस्थांना माह...
-
शिंदखेडा तालुक्यातील बेटावद गावात वडार वाडा परिसरात अवैध गावठी दारू अड्ड्यावर नरडाणा पोलिसांनी सोमवारी सकाळी छापा टाकत मोठी कारवाई केली. या ...
-
नाशिक प्रतिनिधी :नाशिक गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या डिके नगर पोलीस चौकीत रात्री अकरा वाजेच्या सुमारास ४ ते ५ पोलीस कर्मचारी ओली पार्...
-
धुळे प्रतिनिधी :- "शिक्षणाचे मंदिर" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाळेत प्रसूती रजा मंजूर करण्यासाठी लाच मागणाऱ्या मुख्याध्यापिका आणि ...
-
बेटावद प्रतिनिधी : दिनांक 5 जुलै 2025 रोजी रात्री 1:45 वाजेच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नरडाणा ग्र...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा