Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २ ऑगस्ट, २०२५

पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...!



पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...!
"सामाजिक कार्यकर्त्या सौ.नंदाताई म्हात्रे( महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस काँग्रेस)यांचा आंदोलनाचा इशारा"..          
लाडक्या बहिणींना आता तरी पूर्णवेळ स्रीरोग तज्ञ भेटतील का? पेण उपजिल्हा रुग्णालयात ग्रामीण भागातील गोरगरीब महिला प्रसूतीसाठी येतात. दरमहा जवळपास ३०-४० सामान्य प्रसुती होतात, ज्या येथील स्टाफनर्स आहेत आणि MBBS डॉक्टर आहेत ते करतात.मात्र गंभीर स्वरूपाच्या प्रसूतीसाठी जिल्हा रूग्णालय अलिबाग येथे महिला रूग्णांना पाठविलं जाते, ज्यामध्ये वेळ जातो आणि गरोदर महिला आणि होणाऱ्या बाळाला धोका निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. आणि गोरगरीब महिला रुग्णांना रुग्णवाहिका किंवा खासगी गाडीने अलिबाग जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागतात. लाडक्या बहिणींना आता तरी पूर्णवेळ स्रीरोग तज्ञ भेटतील का? असा सवाल पेण तालुक्यातील जनता विचारात आहे ? 

येथील स्थानिक आमदार खासदारांना याच काहीच देणं घेणं नाही? कारण त्यांच्या लेकी सूनांची बाळंतपण मोठं मोठ्या मल्टीस्पेशालिटी खाजगी रूग्णालयात होतात पण सर्वसामान्य जनतेच काय ? सन २०१३ पासून पेण उपजिल्हा रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांच्या रिक्त जागा भरण्यासाठी आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी एका ओळिचेही पत्र लिहीले नाही ? की अधिवेशन सभागृहात ह्याविषयी एकदाही प्रश्न उपस्थित केला नाही ? अशा बेजबाबदार लोकप्रतिनिधींनी आता राजिनामे दिले पाहिजेत आणि पूर्णवेळ पैठणीचे खेळ आणि हळदिकुंकु करत राहिलं पाहिजे, जिथे मेल्यावर ५ कोटीच स्मशान आहे, मात्र जगण्यासाठी आवश्यक आरोग्यसेवा आणि तज्ञ डॉक्टर नाहीत. हे अपयश इथल्या लोकप्रतिनिधींचाच आहे हे मी तरी ठामपणे सांगू शकते..! सामाजिक कार्यकर्त्या सौ.नंदाताई म्हात्रे

रायगड जिल्हा प्रतिनिधी कैलासराजे घरत 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध