Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १९ ऑगस्ट, २०२५

श्रीरामपुर परीसरात बनावट विदेशी मद्यावर राज्य उत्पादन शुल्क कोपरगांव विभागाची कारवाई


कोपरगाव प्रतिनिधी:- मा.राजेश देशमुख साहेब आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, मा. प्रसाद सुर्वे साहेब सह आयुक्त अंमलबजावणी व दक्षता महाराष्ट्र राज्य राज्य उत्पादन शुल्क मुंबई, मा.सागर धोमकर विभागीय उपआयुक्त राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग, मा. प्रमोद सोनोने अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहिल्यानगर, मा. प्रविणकुमार तेली उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहिल्यानगर यांचे मार्गदर्शनाखाली दि.19/08/2025 रोजी पहाटे 4.00 सुमारास शिरसगांव-श्रीरामपुर रोडवर, श्रीरामपुर, ता.श्रीरामपुर, जि.अहिल्यानगर या ठिकाणी बनावट विदेशी मद्य वाहतुक करताना आरोपी नामे पोपट भास्कर पवार आशीर्वादनगर, काळे वस्तीजवळ, वार्ड नं.1, श्रीरामपुर, ता.
श्रीरामपुर, जि.अहिल्यानगर याचे ताबेकब्ज्यातुन एक होंडा कंपनीची शाईन क्र.MH-17-CZ-9766 व बनावट विदेशीमद्य तसेच आरोपीचे राहाते घरी जावुन झडती घेतली असता बनावट विदेशी दारू 180 मिली मापाच्या इम्पिरीयल ब्लयु, रॉयल स्टॅग व्हिस्की, ओ.सी.ब्ल्यु व्हिस्की व मॅकडॉल नं.1 व्हिस्की विविध बॅच क्र. असलेल्या असे एकुण 169 बाटल्या, बनावट बुचे, मोकळ्या बाटल्या, व इतर साहित्य जप्त करण्यात आले असे एकुण 1,40,585/- किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला. बनावट दारुची ॲन्टोनपार मशीनच्या सहाय्याने तपासणी केली असता सदर विदेशी दारु बनावट असल्याचे प्रथम दर्शनी दिसुन येते. सदर आरोपी वापरलेल्या बाटल्यांचा पुर्नर वापर करुन त्यामध्ये बनावट व आरोग्यास अपायकारक मद्य भरुन त्यावर पुन्हा बनावट बुचे लावुन त्याची विक्री अवैध दारु विक्री करणा-या इसमामार्फत करत होता.
 सदर आरोपी नामे पोपट भास्कर पवार वय-40 वर्ष रा.आशीर्वादनगर, काळे वस्तीजवळ, वार्ड नं.1, श्रीरामपुर, ता.श्रीरामपुर, जि.अहिल्यानगर याचे विरुद्ध मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65 (अ) (ब) (ड) (ई) (फ) व 81, 83, 90, 108 अन्वये रितसर गुन्हा नोंद केला आहे. सदर आरोपीस मा.न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे. सदर कारवाई निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कोपरगाव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध