Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
बुधवार, २० ऑगस्ट, २०२५
त-हाडी येथे शिरोमणी श्री.संतसेना महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
त-हाडी (ता. शिरपूर):नाभिक समाजाचे आराध्य दैवत व भक्तीमूर्ती संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त-हाडी येथे दिनांक २० ऑगस्ट रोजी अभिवादनाचा कार्यक्रम अत्यंत श्रद्धा, भक्तीभाव आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संपूर्ण गावात धार्मिकता आणि ऐक्याचा संदेश देणारा हा कार्यक्रम स्मरणीय ठरला.
अभिवादन व पूजन विधी
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कृषीभूषण सुदाम करंके यांनी भूषविले. त्यांच्या हस्ते संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच फौजी चेतन डामरे यांनी जीवा महाले यांच्या प्रतिमेचे पूजन करून आपली कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी उपस्थित समाजबांधव व ग्रामस्थांनी संतांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आपली श्रद्धांजली वाहिली.
महापुरुषांना वंदन
संतांच्या पुण्यतिथीप्रसंगी उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन केले. तसेच एकलव्य, बिरसा मुंडा, क्रांतिवीर समशेरसिंग, अहिल्याबाई होळकर यांच्यासह अनेक महापुरुषांना वंदन करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
संतांचे विचार आजही मार्गदर्शक
मार्गदर्शन करताना कृषीभूषण सुदाम करंके व रावसाहेब चव्हाण सर यांनी संत सेना महाराजांच्या भक्तिमय जीवनप्रवासावर प्रकाश टाकला.
त्यांनी संतांनी समाजाला दिलेला समता, सेवा, प्रामाणिकपणा व भक्तीचा संदेश आजही किती महत्त्वाचा आहे, यावर भर दिला.
“संतांचे विचार पिढ्यान्पिढ्या पोहोचविणे हीच खरी समाजसेवा आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला तापी विद्या परिसर अध्यक्ष सुभाष भामरे सूतगिरणी संचालक बापुसो.सुदाम भलकार
पिक सोसायटी माजी चेअरमन विलास भामरे माजी सरपंच दादासौ कैलास भामरे,मल्हार सेना माजी जिल्हा अध्यक्ष भाउसो सुनील धनगर
कृषी मित्र किरण भामरे
नवनियुक्त शालेय समिती अध्यक्ष किरण अहिरे
मा.पी. सो. चेअरमन रावसाहेब कदम,आबासो नथा खोंडे, नानासो ओंकार खोंडे व्हाईस चेअरमन शिवराम पाटील भगवान खोंडे
तसेच विशाल करंके, लक्ष्मण सैंदाणे, वामन भामरे, सुनील भामरे, शरद सोनवणे, आधार कोळी, गोकुळ सैंदाणे, देविदास खोंडे, आनंदा पाटील, शांतीलाल खोंडे, कचरू अहिरे, मुन्ना भदाणे, हिलाल खोंडे, योगेश पारधी, रवींद्र धनगर,सुनिल खोंडे, किरण पारधी, राकेश खोंडे व शिपाई आत्माराम बागुल आदींचा समावेश होता.
कार्यक्रमाचे आयोजक
या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन धनराज खोंडे, जितेंद्र खोंडे, सागर खोंडे, चेतन सैंदाणे, चैतन्य खोंडे, दिनेश खोंडे, प्रकाश खोंडे, महेंद्र खोंडे, मनिष सैंदाणे, रोहित खोंडे व पत्रकार ज्ञानेश्वर सैंदाणे यांनी एकत्रितपणे केले.
आकर्षक सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम अहिरे यांनी प्रभावी आणि आकर्षक पद्धतीने केले. त्यांच्या संयोजनामुळे संपूर्ण कार्यक्रम माहितीपूर्ण व संस्मरणीय ठरला.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
-
रासायनिक खतांचा शेतीत वापर केल्यामुळे 1970 ते 2000 या 4 दशकात शेती उत्पन्न वाढत गेले, पण बागायती व सिंचनाच्या सोयी मोठ्याप्रमाणात उपलब्ध झ...
-
त-हाडी (ता. शिरपूर):नाभिक समाजाचे आराध्य दैवत व भक्तीमूर्ती संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त-हाडी येथे दिनांक ...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
वनविभागाची गुप्त बातमी वरुन साठवून ठेवलेला मका पिकातील 55 ते 60 लाखाचा सुका गांजा मुद्देमाल जप्त आज दि.८/०४/२०२५ रोजी सांगवी वनविभागातील परि...
-
शिरपूर प्रतिनिधी :- ७ वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या बाळा उर्फ अनिल किरोभा काळे वय २८ याच्यावर “भार...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा