Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ३ ऑगस्ट, २०२५

दहीवेल पत्रकार संघाची कार्यकारणी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या शुभहस्ते जाहीर. अध्यक्षपदी नितीन बच्छाव व उपाध्यक्षपदी प्रणेता देसले यांची निवड.



साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार भाऊ रावल यांच्या शुभहस्ते जाहीर करण्यात आली. दहिवेल पत्रकार संघाचे अध्यक्षपदी नितीन बच्छाव उपसंपादक दैनिक खान्देश मैदान, उपाध्यक्षपदी प्रणेता देसले धुळे जिल्हा प्रतिनिधी दैनिक अवज व आवाज न्युज चॅनेल, सचिवपदी संदीप बच्छाव दैनिक लोकमत प्रतिनिधी, सहसचिवपदी  मनोहर बच्छाव दैनिक दिव्य मराठी प्रतिनिधी, खजिनदारपदी संजय बच्छाव दैनिक स्वराज्यदूत प्रतिनिधी, मार्गदर्शक संचालकपदी पी आर चौधरी दैनिक पुण्यनगरी प्रतिनिधी, सल्लागार संचालकपदी विनायक पाटील दैनिक सकाळ प्रतिनिधी, यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या तसेच श्री कन्हैयालाल महाराज खाजगी कृषी मार्केटचे संचालक कन्हैयालाल माळी यांच्या प्रस्तावित साप्ताहिक दिव्य लक्ष्मी चे नामदार जयकुमार भाऊ रावल यांच्या शुभहस्ते मुहूर्तमेढ करण्यात आली. दहीवेल पत्रकार संघ हा पत्रकारिते बरोबर परिसरात विविध सामाजिक उपक्रम देखील राबविणार आहे तचेस वेळोवेळी पत्रकार बंधुंच्या अडीअडचणी व समस्या शासन दरबारी मांडण्याचा व सोडविण्यासाठी देखील प्रयत्न करणार आहे. दहीवेल पत्रकार संघातर्फे पत्रकार बांधवांसाठी विविध कल्याणकारी योजना सुरू करण्यासंदर्भात देखील शासन दरबारी प्रयत्न करण्यात येणार आहेनामदार जयकुमार रावल यांनी दहीवेल पत्रकार संघाला पुरेपूर मदत करण्याचे आश्वासन दिले. दहीवेल पत्रकार संघाच्या कार्यकरणीला सामाजिक, शैक्षणिक, राजकिय क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या वतीने शुभेच्छाचा वर्षाव करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध