Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २१ ऑगस्ट, २०२५
पोशिंदा चा ऑरगॅनिक खते वापरणे शेतकऱ्यांसाठी काळाची गरज.
रासायनिक खतांचा शेतीत वापर केल्यामुळे 1970 ते 2000 या 4 दशकात शेती उत्पन्न वाढत गेले, पण बागायती व सिंचनाच्या सोयी मोठ्याप्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे आपण वर्षातून 2/3 पिके घेऊ लागलो त्याप्रमाणात रासायनिक खतांचा हि वापर वाढला, आणि त्याचा व्हायचा तो परिणाम आज आपल्याला दिसत आहे, आपल्या शेत जमिनीची उत्पादकता दरवर्षी घटत चालली आहे.रासायनिक खते (केमिकल्स) मुळे आपल्या जमिनीतील जिवाणूंची संख्या नगण्य झाली आहे, शेतजमिनी निकृस्ट ,बंजर, खारट,चिबड होत चालल्या आहेत,जमिनीची उत्पादकता दिवसेंदिवस घटत चालली आहे आणि त्याला कारण म्हणजे सेंद्रिय खतांचा अभाव.जोपर्यंत आपण शेतीत पोशिंदा चा सेंद्रिय खतांचा व जिवाणूंचा वापर वाढवत नाही तोपर्यंत आपले शेती चे उत्पन्न वाढणार नाही, आणि म्हणून रासायनिक खतांचा वापर 50% ने कमी करा व 30 ते 35% सेंद्रिय खतांचा आणि 15 ते 20% जैविक खतांचा वापर वाढवा.बाजारात उपलब्ध असलेल्या चांगल्या प्रतीचे सेंद्रिय खत वापरा.जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी शेणखत, कंपोस्ट खत,पाझर तलावातील गाळ,हिरवळीची खते, विविध प्रकारच्या पेंडी, गांडूळ खत ,शेतात शेळ्या मेंढ्या बसवा, कोंबळी खत,हाडांचा चुरा,आणि मुख्य म्हणजे जमिनीतील पिकांचे अवशेष जमिनीतच कुजू द्या जाळू नका.वरील सर्व गोष्टींपासून आपल्या शेतजमिनीत ह्युमस चे प्रमाण वाढेल व ह्युमस पासून सेंद्रिय कर्ब तयार होईल,हाच सेंद्रिय कर्ब जिवाणूंचे खाद्य असतो,त्यामुळे जमिनीतील जिवाणूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होईल,व आपला रासायनिक खतांवरचा खर्चही कमी होईल.
पोशिंदा चा सेंद्रिय खताचें फायदे
सेंद्रिय खतामुळे मातीतील कणांची रचना दाणेदार बनते,शिवाय रचना स्थिर राहण्यास मदत होते. कणांची रचना उत्कृष्ट झाल्यामुळे जमिनीची जलधारणा शक्ती वाढते. निचरा व्यवस्थित होतो व हवा खेळती राहते,त्यामुळे मातीच्या कणांतील मुलद्रव्यांची अदलाबदल सहजरित्या होते.
हे सेंद्रिय खत जमिनीत पिकांचे गरजेनुसार अन्नद्रव्ये पुरवून पिकाची भूक भागवितात व जमिनीची सुपिकता वाढवतात.
सेंद्रिय पदार्थाच्या आच्छादनामुळे जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा आघात कमी होऊन,जमिनीची धूप कमी होते. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीच्या खालच्या थरापर्यत हळुहळु झिरपुन जमिनीतील उपलब्ध ओलावा पिकांना जास्त काळ मिळु शकतो जमिनीचा आकसपणा,चिकटपणा,टणकपणा,भेगा पडणे इ. अनावश्यक क्रिया कमी होतात.त्यामुळे जमिनीची मशागत चांगल्या प्रकारे करता येते.
सेंद्रिय खताच्या वापरामुळे जमीन सछिद्र बनते.मुळांची संख्या वाढते तसेच फळांचे वजन व आकारमानात सुध्दा वाढ होऊन उत्पादन वाढीस लागते.
मुरमाड जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण सर्वसाधारणपणे कमी असल्याने सेंद्रिय खतांचा वापर केल्यास त्या जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण वाढते.
जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे विघटन होऊन ह्युमिक ,फुल्विक व ह्युमीक मध्ये रुपांतर होते. या पदार्थामुळे पिकांचे वाढीत लक्षणीय फरक आढळून येतो.तसेच जमिनीतील पालाश खनिजांचे विघटन होऊन जमिनीतील उपलब्ध पालाशचे प्रमाण वाढते.
खारट व चोपण जमिनीचा खारट व चोपणपणा कमी होऊन भौतिक गुणधर्मात अमुलाग्र बदल होतात.उदा. जमिनीची जलधारणा शक्ती,पाणी मुरण्याचा वेग,जमिनीची वाहकता,जमिनीतील हवेचे प्रमाण,चिकटपणा,मातीची रचना तसेच एकनिष्टता व संलग्न दाब इ.भौतिक गुणधर्मात सुधारणा होते.
सेंद्रिय खताच्या वापरामुळे जमिनीतील जीवाणूंच्या संख्येत वाढ होऊन त्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. परिणामी पिकास उपलब्ध अन्नद्रव्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो.
वरील सर्व कारणांसाठी आपण आपल्या शेतीत सेंद्रिय खतांचा वापर वाढावा ,सेंद्रिय खतांमुळे पिकांची प्रतिकार क्षमता वाढेल व आपले शेती उत्पनातं आपोआप वाढ होईल.
धन्यवाद.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
-
रासायनिक खतांचा शेतीत वापर केल्यामुळे 1970 ते 2000 या 4 दशकात शेती उत्पन्न वाढत गेले, पण बागायती व सिंचनाच्या सोयी मोठ्याप्रमाणात उपलब्ध झ...
-
त-हाडी (ता. शिरपूर):नाभिक समाजाचे आराध्य दैवत व भक्तीमूर्ती संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त-हाडी येथे दिनांक ...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
वनविभागाची गुप्त बातमी वरुन साठवून ठेवलेला मका पिकातील 55 ते 60 लाखाचा सुका गांजा मुद्देमाल जप्त आज दि.८/०४/२०२५ रोजी सांगवी वनविभागातील परि...
-
शिरपूर प्रतिनिधी :- ७ वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या बाळा उर्फ अनिल किरोभा काळे वय २८ याच्यावर “भार...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा