Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २१ ऑगस्ट, २०२५

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करनाऱ्यावर गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 याबाबत अधिक माहिती अशी की, १४ वर्षे ८ महिने वय असलेली पिडीता आपल्या बहिणीच्या सासरी निशाणे (ता धरणगाव) येथे राहायला गेली असता तिची ओळख अजय सुकलाल मोरे (वय २१) याच्याशी झाली होती. त्यातून त्यांच्यात प्रेमसंबंध झाले. पीडितेचे आई,वडील भाऊ कामानिमित्त बाहेर गेलेले असताना अजय मोरे हा निशाणे येथून मांजर्डी येथे पीडितेच्या घरी येऊन बळजबरीने शारीरिक संबंध ठेवत होता. पीडितेने विरोध केला असता तो तिच्या आईवडिलांना सांगायची धमकी देत होता. त्यामुळे पीडिता त्याला विरोध करत नव्हती. कालांतराने पीडिता गर्भवती राहिली. तिचे पोट मोठे होत असल्याने बहिणीने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सर्व प्रकरण उघडकीस आले. तिची वैद्यकीय चाचणी केली असता ती सात महिन्यांची गर्भवती होती. महिला दक्षता समितीसमोर पीडितेचे जबाब घेऊन अजय मोरे यांच्याविरुद्ध  भारतीय न्याय संहिता कलम ६५ (१), ३५१(२) आणि पोक्सो कायदा कलम ४,६,८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत. आरोपी अजय मोरे याला अटक करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध