Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २३ ऑगस्ट, २०२५

बोरगांव येथे श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त कीर्तनाचा कार्यक्रम



शिरपूर प्रतिनिधी : तालुक्यातील बोरगांव येथे श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री ह भ प गोपाळ महाराज दापोरीकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सेना महाराज हे एक वारकरी संप्रदायातील संत होते त्यांना ज्ञानदेव-नामदेवांच्या परिवारातील मानले जाते. पुण्यतिथीचे औचित्य साधत गावातील नाभिक समाजाने कीर्तनाचे आयोजन केले ज्यात परिसरातील वारकरी संप्रदाय व भजनी मंडळींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. 

दापोरीकर महाराजांनी कीर्तनात सांगितले की, श्री सेना न्हावी ज्यांना संत सेना महाराज म्हणून ओळखले जाते. सेना महाराज हे विठ्ठल आणि रुक्मिणी यांचे निस्सीम भक्त होते. त्यांची पुण्यतिथी दरवर्षी श्रावण महिन्यात असते. मध्यप्रदेशातील बांधवगडमध्ये जन्मलेल्या सेना महाराजांचा मूळ व्यवसाय नाभिकाचा. बादशाहाची हजामत करण्याचा मान त्यांच्याकडे होता. शरीराने आपले कर्तव्य पार पाडतांना सेना महाराजांचे मन मात्र देवपूजेत रमलेले. एकदा बादशाहाने त्यांना हजामतीला बोलावले. तर सेना महाराज पूजेत रममाण झाले होते. तेव्हा बादशाहा चिडला आणि त्याने सेना महाराजांना पकडण्याचे आदेश दिले. तेव्हा प्रत्यक्ष विठ्ठलाने बादशाहाची हजामत केली आणि सेना महाराजांना वाचविले. 

    सेना महाराजांनी आपल्या अभंगातूनही याच भक्तिरसाची उपासना केलेली आढळते. एका हिंदी भाषिक संतांची मराठी भक्तिरचना वाचताना महाराष्ट्र्रातील भक्तांना जरासुद्धा वेगळेपण जाणवत नाही. ज्ञानेश्र्वर, तुकाराम महाराजां इतकेच संत सेना महाराजांना श्रेष्ठ मानले जाते. 

ह भ प श्री दापोरीकर महाराजांचे स्वागत श्री सुभाष बारकू न्हावी, प्रकाश राजाराम येशी, कौतिक तोताराम न्हावी, सखाराम निळकंठ येशी यांनी केले. यावेळी माजी सैनिक दगेसिंग राजपूत, नारायण लकडू राजपूत, माजी सरपंच गोकुळ चिंधा येशी, ह.भ.प विठ्ठल झुलाल कोळी, विकासो चेअरमन योगेंद्रसिंग सिसोदिया, सरपंच दीपक पदमसिंग राजपूत, पोलीस पाटील मनोहर पाटील, रविंद्र राजाराम न्हावी, विणेकरी जालिंदर न्हावी, भाईदास तोताराम न्हावी, मुकेश जोशी, भगवान पितांबर न्हावी, बाबुराव बोरगांवकर, हरी गबा न्हावी, रोहिदास कौतिक न्हावी, ज्ञानेश्वर वारुडे, नथू न्हावी, मच्छिन्द्र न्हावी, जितेंद्र तुकाराम न्हावी, चिंधा न्हावी, भानुदास न्हावी, कुंदन न्हावी, राजू न्हावी, दिनेश न्हावी, अक्षय न्हावी, सागर न्हावी, प्रणेश न्हावी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध