Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २५ ऑगस्ट, २०२५

थाळनेर पोलिसांची मोठी कारवाई: जुगार अड्ड्यावर छापा, हातभट्टी उद्ध्वस्त



शिरपूर प्रतिनिधी : थाळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिसाळे गावात पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला आणि गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त केली. या कारवाईत ११ जुगारींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून १,२०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच, हातभट्टी चालवणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली असून, सुमारे ३१,१०० रुपयांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट करण्यात आला.

          जुगार अड्ड्यावर छापा

२४ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता थाळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, सहायक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की, हिसाळे गावाच्या शिवारात काही लोक 'झन्ना मन्ना' नावाचा पत्त्यांचा जुगार खेळत आहेत. या माहितीच्या आधारे सपोनि. पाटील यांनी आपल्या पोलीस पथकासह छापा टाकला. त्यावेळी, योगेश सुभाष राठोड, शाम फत्तेसिंग जाधव, संदीप दिलीप पाटील, भाऊसाहेब तान्हु गायकवाड, राहुल विघन करंकाळ, अशोक तुंबडु भिल, रविंद्र दिलीप कोळी, समाधान महारु पाटील, कैलास गुलाब कोळी, युकेश ताराचंद जाधव आणि राधेशाम रामसिंग पांवरा या ११ जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून १,२०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

             हातभट्टी उद्ध्वस्त

जुगाराची कारवाई सुरू असतानाच, त्याच भागात किशोर प्रताप कोळी नावाचा व्यक्ती गावठी दारूची हातभट्टी चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत किशोर कोळी याच्या पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला आणि गावठी दारू तयार करण्याची भट्टी शोधून काढली. ही भट्टी उद्ध्वस्त करून त्यासाठी वापरले जाणारे माठ, ड्रम, पातेले आणि कच्चा माल असा एकूण ३१,१०० रुपयांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट करण्यात आला. आरोपी किशोर कोळी याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरपूर सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये सपोनि. शत्रुघ्न पाटील यांच्यासह पोहेकॉ राजेंद्र भिल,भुषण रामोळे, पोकॉ.किरण सोनवणे,धनराज मालचे,पोकॉ योगेश पारधी,रामकृष्ण बोरसे आणि चापोकॉ.आकाश साळुंखे यांचा आदिंच्या पथकाने केली.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध