Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २९ ऑगस्ट, २०२५

शिरपूर - खर्दे बुद्रुक रस्त्यावरील अरुणावती नदी पुलाची दयनीय अवस्था



उंटावद प्रतिनिधी :- शिरपूर खर्दे बुद्रुक रस्त्यावरील अरुणावती नदी पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून सळई देखील बाहेर निघाल्या आहेत. या भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे दररोज किरकोळ अपघात होत आहेत. तसेच खड्ड्यांचा अंदाज वाहनधारकांना न आल्यास वाहने जोरात आदळली जातात व खड्ड्यातील डपक्यामधील पाणी पदयात्रीचं अंगावर शिंतोडे उडतात व वाहने नादुरुस्त होतात तसेच पदयात्री यांना पायी चालणे जिकिरीची ठरत आहे तसेच नदीला पाणी असल्याने रात्री या ठिकाणी अंधार असतो अंधारात अपघात होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे या ठिकाणी पथदिवे देखील बसविण्यात यावेत शिरपूर बाजारपेठ असल्याने खर्दे बुद्रुक, उंटावद, साकवद, बाळदे परिसरातील शेतकरी आपला ट्रॅक्टर शेतीमाल घेऊन याच रस्त्याने प्रवास करीत असतअसतात तसेच परिसरातील विद्यार्थी शाळेत व कॉलेजमध्ये जाण्यासाठी याच रस्त्याने प्रवास करतात सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे  पुलावरील संबंधित खड्डे त्वरित बुजवावे व पथदिवे लावून अंधार दूर करावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेमधून होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध