Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
रविवार, ३१ ऑगस्ट, २०२५
Home
/
Unlabelled
/
वासरे येथील वस्तीत पाणी शिरल्याने सुमारे ८२ घरातील अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान
वासरे येथील वस्तीत पाणी शिरल्याने सुमारे ८२ घरातील अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान
.अमळनेर :-प्रतिनीधी तालुक्यातील मारवड मंडळात ता.२९ रोजी १२० मि.मी.पाऊस झाल्याने वासरे येथील वस्तीत पाणी शिरल्याने सुमारे ८२ घरातील अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाल्याने ते कुटुंब उघड्यावर आले आहेत.
तर कळमसरेत अतिवृष्टीमुळे सुमारे १५ घरांची पडझड झाली असून दुसऱ्या २५ घरांमध्ये पुराचे पाणी साचले होते.
अमळनेर तालुक्यात अति वृष्टी झाल्याने अनेक ठिकाणी वस्त्यांमध्ये पाणी , गावांचा संपर्क तुटला , शेतांचे अतोनात नुकसान झाले. उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी तातडीने ग्राम महसूल अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांना आपद्ग्रस्तांच्या मदतीला पाठवले. वासरे येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागील गल्लीतील लोकांना पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढून त्यांना समाज मंदिरात तसेच गावातील उंच ठिकाणी असलेल्या घरांमध्ये राहण्याची सोय करण्यात आली. सुमारे ८२ कुटुंब उघड्यावर आली आहेत. काहींची घरे पडली तर सर्वांच्या घरातील संसारोपयोगी वस्तू अन्न धान्याची नासाडी झाली. इतर गावकरी मदतीला धावले आणि त्यांच्यातर्फे उघड्यावर पडलेल्या कुटुंबाच्या भोजनाची व्यवस्थाही ग्रामस्थांनी केली. दुसऱ्या दिवशी वासरे येथील सामाजिक कार्यकर्ते रोहिदास पाटील यांनी दिवसा तर लायन्स क्लब अमळनेर यांनी रात्रीचे जेवण दिले. तर कळमसरे ,निम , शहापूर, येथील अडकलेल्या लोकांना बाहेर काढून त्यांना ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयात हलवण्यात आले आहे. आज ता. 30 रोजी वासरे येथे ८२ कुटुंबाचे नुकसान झाले असून यावेळी ग्राम महसूल अधिकारी
मुकेश देसले, ग्रामपंचायत अधिकारी अशोक पाटील, कृषी सहाय्यक गणेश पाटील यांनी नुकसानीचा संयुक्त पंचनामा केला.
कळमसरेत अतिवृष्टीमुळे सुमारे १५ घरांची पडझड झाली असून दुसऱ्या २५ घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने अन्नधान्य तसेच काही संसारोपयोगी वस्तूंची देखील नुकसान झाले आहे. कळमसरे येथील स्वस्त धान्य दुकानात पुराचे पाणी शिरल्यामुळे सुमारे 30 क्विंटल धान्याची नासाडी झाली असून पंचनामा करण्यात आला आहे.
सदर नुकसानीचे पंचनामे ग्राम महसूल अधिकारी कळमसरे भूषण पाटील,ग्रामपंचायत अधिकारी ज्ञात्नेश्वर पाटील कृषी सहायक अजय पवार, पोलीस पाटील गोपाल माळी, कोतवाल आधार सोनवणे
यांचा उपस्थितीत करण्यात आला.तसेच टाकरखेडा , मुडी, मांडळ येथे ढग फुटी सदृश्य पावसामुळे हजारो हेक्टर मका , कपाशी आणि उडीद ,मूग पिकांचे नुकसान झाले आहे. पिके शेतात आडवी पडली आहेत.
घटनास्थळी खासदार स्मिता वाघ , माजी जि.प. सदस्य जयश्री पाटील , पंचायत समितीचे माजी उपसभापती भिकेश पाटील बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, भैरवी पलांडे , बाजार समितीचे संचालक समाधान धनगर,डॉ अनिल शिंदे, एल. टी. पाटील, यांच्यासह प्रशांत धमके यांनी वासरे व इतर गावांना भेटी देऊन आपद्ग्रस्तांचे सांत्वन केले. खासदार वाघ आणि आमदार अनिल पाटील यांनी प्रशासनला तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. दुसऱ्या दिवशीही पाऊस सुरू असल्याने तालुक्यात नेमके किती नुकसान झाले हे कळू शकले नाही.
*वासरे गावाची संवेदनशीलता-----*
वासरे येथे सर्व बाधीत कुटुंबाना काल आणि आज निवासाची सोय करीत जेवणाची सोय देखील उपलब्ध करून दिली आहे. बऱ्याच जणांनी बाधित कुटुंबाना आपल्या घरी आसरा दिला आहे.ग्रामपंचायती मार्फत पाच किलो गहू पीठ, पाच किलो साखर, चहा पावडर,एक लिटर खाण्याचे तेल, मीठ पिशवी, मिरची पूड असा लहानसा शिधा ग्रामपंचायत मार्फत वाटप करण्यात आले.
*सरसकट पंचनामा करण्याची मागणी*---
मारवड मंडळासह तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शेती पिकांचा सरसकट पंचनामा करण्यात यावा अशी मागणी असून शासनाने व लोकप्रतिनिधी यांनी याबाबत लक्ष घालावे अशीही मागणी होत आहे. दरम्यान अमळनेर शहरांसह तालुक्यातील अनेक गावांमध्ये नुकसान झाले आहे. वासरे, कळमसरे, शहापूर, खेडी, खर्दे, पाडसे, तांदळी, नीम, मारवड, पाडळसरे, गोवर्धन, बोहरा, डांगरी, सात्री, बोरगावं आदी गावातील शेती पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.
*कोट --*
रुपेशकुमार सुराणा (तहसीलदार )
मारवड मंडळासह तालुक्यात ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे त्याठिकाणचे शेती पिकांचे पंचनामे करण्यात येतील. आज वासरे सह ज्या गावात घराचे नुकसान झाले आहे. त्यांचा पंचनामा करून बाधित कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी हलवीण्यात आले आहे.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
उंटावद प्रतिनिधी :- शिरपूर खर्दे बुद्रुक रस्त्यावरील अरुणावती नदी पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून सळई देखील बाहेर निघाल्या आहेत. या भल्या मो...
-
अमळनेर : चोपडा रस्त्यावर गावठी पिस्टल विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकून दोन तरुणांना दोन गावठी पिस्टल ,सहा ज...
-
वासरे ता अमळनेर येथे अतिवृष्टी व ढगफुटीत नुकसान व दैनंदिन जिवन विस्कळीत झालेल्या नागरिकांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचा...
-
पारोळा पोलिसांची धडक कारवाई , ४० लाखाचा मुद्देमाल जप्त अमळनेर : पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे बोरी नदीच्या काठावर पोलिसांनी धा...
-
जळगाव प्रतिनिधी:- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून एका दाम्पत्याने जळगाव शहरातील तब्बल १८ नागरिकांची सुमारे ५५ ...
-
प्रतीनिधी :- गणेश चव्हाण दिनांक 25 ऑगस्ट रोजी आधार संस्था अमळनेर तर्फे बालसंगोपन योजनेच्या लाभ घेणाऱ्या बालक व त्यां...
-
नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार, दि. 26 ऑगस्ट 2025: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांच्या मार्गदर...
-
“अमळनेर नगरपरिषद प्रभाग क्रमांक ३ मधील दलित-मागासवर्गीय वस्तीवर अन्यायकारक प्रभाग रचना.. अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर नगरपरिषद निवडणु...
-
मयत । अमळनेर : मुलाने सख्ख्या बापाच्या डोक्यात लोखंडी हातोडी टाकून त्याचा खून केल्याची घटना ३१ रोजी रात्री साड...
-
.अमळनेर :-प्रतिनीधी तालुक्यातील मारवड मंडळात ता.२९ रोजी १२० मि.मी.पाऊस झाल्याने वासरे येथील वस्तीत पाणी शिरल्याने सुमारे ८२ घरात...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा