Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ४ ऑगस्ट, २०२५
Home
/
Unlabelled
/
तलाठ्याची २५ हजारांची लाचखोरी! लाचलुचपत विभागाची चाळीसगावमध्ये कारवाई – तलाठी मोमीन अडचणीत.
तलाठ्याची २५ हजारांची लाचखोरी! लाचलुचपत विभागाची चाळीसगावमध्ये कारवाई – तलाठी मोमीन अडचणीत.
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. एका शेतजमिनीवरील जुनी हक्कातील नोंद कमी करण्यासाठी तलाठ्यांनी २५,००० रुपयांची लाच मागितल्याचा ठपका असून, सदर रक्कम तलाठ्यांच्या सांगण्यावरून ग्रामपंचायत लोंजेचे रोजगार सेवक वाडीलाल पवार यांनी स्वीकारल्याने त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदारांच्या वडिलांच्या नावे असलेल्या शेतजमिनीवरील जुनी नजर व गहाण घेणाऱ्याचे नाव वगळण्यासाठी अर्ज देण्यात आला होता. २ जुलै २०२५ रोजी तलाठी मोमीन यांना कार्यालयात भेट देण्यात आली असता त्यांनी “तुमचे काम मोठं आहे,वाडीलाल पवार यांच्याशी बोला” असे सुचवले.
त्यानंतर तलाठी, रोजगार सेवक आणि तक्रारदार यांच्यात झालेल्या चर्चेत तलाठ्यांनी कामासाठी पैसे देण्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले. १४ व १७ जुलै रोजी झालेल्या भेटींमध्ये तलाठ्यांनी पुन्हा “वाडीलालला भेटा” असे सांगितले.अखेर २५,००० रुपयांची रक्कम देण्याची मागणी झाली.
३० जुलै २०२५ रोजी सापळा कारवाई करताना वाडीलाल पवार यांनी ही रक्कम चाळीसगाव येथील तलाठी कार्यालयाबाहेर स्वीकारताना रंगेहात पकडले गेले.सदर रक्कम तलाठी मोमीन यांना द्यायची होती, परंतु त्या आधीच अटक करण्यात आली.
ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे,अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे व त्यांच्या टीमने केली.तपासात पद्मावती कलाल, यशवंत बोरसे, राजन कदम,मुकेश अहिरे,संतोष पावरा,प्रशांत बागुल यांचा समावेश होता.
या प्रकरणात खाजगी व्यक्ती दादा बाबू जाधव यांनी लाच देण्यासाठी तक्रारदारास प्रेरित केल्याचा आरोप असून, त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.
हा प्रकार उघड झाल्यामुळे महसूल खात्याची विश्वासार्हता पुन्हा प्रश्नचिन्हात आली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा