Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १ सप्टेंबर, २०२५

वासरे येथिल अतिवृष्टी़मुळे जिवन विस्कळीत झालेल्या नागरिकांना भिकेश पाटिल यांच्या कडुन किराणा किटचे वाटप

वासरे ता अमळनेर येथे अतिवृष्टी व ढगफुटीत नुकसान व दैनंदिन जिवन विस्कळीत झालेल्या नागरिकांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आप्पासो पावभा अमृत पाटील यांच्या कडून दैनंदिन वापरातील वस्तूचे किट वाटून छोटीशी मदत करण्यात आली यावेळी गाव परिसरातील सर्व भिकेशभाऊ मित्र परिवार उपस्थित होते* मारवड मंडळात ता.२९ रोजी १२० मि.मी.पाऊस झाल्याने वासरे येथील वस्तीत पाणी शिरल्याने सुमारे ८२ घरातील अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाल्याने ते कुटुंब उघड्यावर आले आहेत.
तर कळमसरेत अतिवृष्टीमुळे सुमारे १५ घरांची पडझड झाली असून दुसऱ्या २५ घरांमध्ये पुराचे पाणी साचले होते.
      अमळनेर तालुक्यात अति वृष्टी झाल्याने अनेक ठिकाणी वस्त्यांमध्ये पाणी , गावांचा संपर्क तुटला , शेतांचे अतोनात नुकसान झाले. उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी तातडीने ग्राम महसूल अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांना आपद्ग्रस्तांच्या मदतीला पाठवले.  वासरे येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागील गल्लीतील लोकांना पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढून त्यांना समाज मंदिरात तसेच गावातील उंच ठिकाणी असलेल्या घरांमध्ये राहण्याची सोय करण्यात आली. सुमारे ८२ कुटुंब उघड्यावर आली आहेत. काहींची घरे पडली तर सर्वांच्या घरातील संसारोपयोगी वस्तू  अन्न धान्याची नासाडी झाली.  इतर गावकरी  मदतीला धावले आणि त्यांच्यातर्फे उघड्यावर पडलेल्या कुटुंबाच्या  भोजनाची व्यवस्थाही ग्रामस्थांनी केली. दुसऱ्या दिवशी वासरे येथील सामाजिक कार्यकर्ते रोहिदास पाटील यांनी दिवसा तर लायन्स क्लब अमळनेर यांनी रात्रीचे जेवण दिले.  तर कळमसरे ,निम , शहापूर,  येथील अडकलेल्या लोकांना बाहेर काढून त्यांना ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयात हलवण्यात आले आहे. आज ता. 30 रोजी वासरे येथे ८२ कुटुंबाचे नुकसान झाले असून यावेळी ग्राम महसूल अधिकारी
मुकेश देसले, ग्रामपंचायत अधिकारी अशोक पाटील, कृषी सहाय्यक गणेश पाटील यांनी नुकसानीचा संयुक्त पंचनामा केला.

    घटनास्थळी खासदार स्मिता वाघ , माजी जि.प. सदस्य जयश्री पाटील , पंचायत समितीचे  माजी उपसभापती भिकेश पाटील  बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, भैरवी पलांडे , बाजार समितीचे संचालक समाधान धनगर,डॉ अनिल शिंदे, एल. टी. पाटील, यांच्यासह प्रशांत धमके यांनी वासरे व इतर गावांना भेटी देऊन आपद्ग्रस्तांचे सांत्वन केले. खासदार वाघ आणि आमदार अनिल पाटील यांनी प्रशासनला तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. दुसऱ्या दिवशीही पाऊस सुरू असल्याने तालुक्यात नेमके किती नुकसान झाले हे कळू शकले नाही.

वासरे गावाची संवेदनशीलता--
वासरे येथे सर्व बाधीत कुटुंबाना काल आणि आज निवासाची सोय करीत जेवणाची सोय देखील उपलब्ध करून दिली आहे. बऱ्याच जणांनी बाधित कुटुंबाना  आपल्या घरी आसरा दिला आहे.ग्रामपंचायती मार्फत पाच किलो गहू पीठ, पाच किलो साखर,  चहा पावडर,एक लिटर खाण्याचे तेल, मीठ पिशवी, मिरची पूड असा लहानसा शिधा ग्रामपंचायत मार्फत वाटप करण्यात आले.

मारवड मंडळासह तालुक्यात ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे त्याठिकाणचे शेती पिकांचे पंचनामे करण्यात येतील. आज वासरे सह ज्या गावात घराचे नुकसान झाले आहे. त्यांचा पंचनामा करून  बाधित कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी हलवीण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध