Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ४ सप्टेंबर, २०२५

शिरपूर येथे भाजपा शिरपूर शहर, शिरपूर ग्रामीण, सांगवी मंडळ व थाळनेर मंडळ नूतन कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, सदस्य यांना 4 सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्रे होणार बहाल



शिरपूर प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी शिरपूर शहर कार्यकारिणी, शिरपूर ग्रामीण कार्यकारिणी, सांगवी मंडळ व थाळनेर मंडळ नूतन कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, सदस्य यांना करवंद रोड जवळ, आर. सी. पटेल फार्मसी कॅम्पस येथील एस.एम.पटेल ऑडिटोरिअम हॉल मध्ये 4 सप्टेंबर 2025 गुरुवार रोजी दुपारी 3 वाजता मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्रे बहाल करण्यात येणार आहेत.

माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम दादा पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे, माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, शहराध्यक्ष चिंतनभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली व अनेक मान्यवरांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी शिरपूर शहर कार्यकारिणी, शिरपूर ग्रामीण कार्यकारिणी, सांगवी मंडळ व थाळनेर मंडळ कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असून सर्व पदाधिकारी व सदस्य यांना नियुक्ती पत्रे बहाल करण्यात येणार आहेत.

कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष तथा उद्योगपती चिंतनभाई पटेल, शिरपूर ग्रामीण अध्यक्ष भरत पाटील, सांगवी मंडळ अध्यक्ष योगेश बागल, थाळनेर मंडळ अध्यक्ष वीरपाल राजपूत, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध