Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, ३ सप्टेंबर, २०२५

एच.आर.पटेल महिला माहाविद्यालयाच्या रासेयो एककाने राबविले स्वच्छता अभियान



शिरपूर प्रतिनिधी : येथील, एच. आर. पटेल कला महिला महाविद्यालयातील रासेयो एककातर्फे प्राचार्या डॉ. शारदा शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली अरुणावती नदी पात्रात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

यानिमित्त, रासेयो एककातील 122 स्वयंसेवक विद्यार्थीनींच्या माध्यमातून निर्माल्य गोळा करण्याची मोहीम राबविण्यात आली. रासेयो गटप्रमुख कोमल पारधी  व रासेयो स्वयंसेवक नंदिनी पाटील, कल्यानी पाटील यांच्या समवेत सर्व रासेयो स्वयंसेवकांनी अरुणावती नदी पात्रातील विसर्जीत गणेश मूर्ती, फूल-हार, प्लास्टीक इत्यादींची शिरपुर नगरपालिका घंटा गाडीच्या माध्यमातून विल्लेवाट लावली.

याप्रसंगी, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. आर. एम. वाडिले, रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. मनिषा चौधरी व रासेयो सहायक कार्यक्रम अधिकारी श्री भास्कर खैरनार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध