Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, १ सप्टेंबर, २०२५
दोन तरुणांना दोन गावठी पिस्टल ,सहा जिवंत काडतुसे सह अटक
अमळनेर : चोपडा रस्त्यावर गावठी पिस्टल विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकून दोन तरुणांना दोन गावठी पिस्टल ,सहा जिवंत काडतुसे व दोन मोटरसायकलिंसह एक लाख ६६ हजार रुपयांच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली.
२८ ऑगस्ट रोजी रात्री पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम याना गोपनीय माहिती मिळाली की चोपडा रस्त्यावर आसाराम बापू आश्रमजवळ दोन इसम पिस्टल विक्री व्यवसाय करीत आहेत. त्यावरून पोलीस निरीक्षक निकम यांनी पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर , मिलिंद सोनार ,उदय बोरसे , निलेश मोरे , विनोद संदानशिव यांच्या पथकाला पाठवले. तेव्हा पोलिसांना पाहताच दोन संशयित इसम पळू लागले. पोलिसांनी त्यांना पकडले असता विशाल भैय्या सोनवणे वय १८ रा ढेकूसीम , गोपाल भीमा भिल वय ३० या दोघांजवळ प्रत्येकी एक एक गावठी पिस्टल आणि प्रत्येकी तीन तीन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी दोघं तरुणांना लागलीच अटक केली तसेच त्यांच्या जवळील मोटरसायकल क्रमांक एम एच ५४ ए ३५४ आणि बिना नंबरची मोटरसायकल असे एकूण १ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघा आरोपींवर शस्र कायदा कलम ३,२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
उंटावद प्रतिनिधी :- शिरपूर खर्दे बुद्रुक रस्त्यावरील अरुणावती नदी पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून सळई देखील बाहेर निघाल्या आहेत. या भल्या मो...
-
अमळनेर : चोपडा रस्त्यावर गावठी पिस्टल विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकून दोन तरुणांना दोन गावठी पिस्टल ,सहा ज...
-
वासरे ता अमळनेर येथे अतिवृष्टी व ढगफुटीत नुकसान व दैनंदिन जिवन विस्कळीत झालेल्या नागरिकांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचा...
-
पारोळा पोलिसांची धडक कारवाई , ४० लाखाचा मुद्देमाल जप्त अमळनेर : पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे बोरी नदीच्या काठावर पोलिसांनी धा...
-
जळगाव प्रतिनिधी:- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून एका दाम्पत्याने जळगाव शहरातील तब्बल १८ नागरिकांची सुमारे ५५ ...
-
प्रतीनिधी :- गणेश चव्हाण दिनांक 25 ऑगस्ट रोजी आधार संस्था अमळनेर तर्फे बालसंगोपन योजनेच्या लाभ घेणाऱ्या बालक व त्यां...
-
नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार, दि. 26 ऑगस्ट 2025: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांच्या मार्गदर...
-
“अमळनेर नगरपरिषद प्रभाग क्रमांक ३ मधील दलित-मागासवर्गीय वस्तीवर अन्यायकारक प्रभाग रचना.. अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर नगरपरिषद निवडणु...
-
मयत । अमळनेर : मुलाने सख्ख्या बापाच्या डोक्यात लोखंडी हातोडी टाकून त्याचा खून केल्याची घटना ३१ रोजी रात्री साड...
-
.अमळनेर :-प्रतिनीधी तालुक्यातील मारवड मंडळात ता.२९ रोजी १२० मि.मी.पाऊस झाल्याने वासरे येथील वस्तीत पाणी शिरल्याने सुमारे ८२ घरात...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा