Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ११ सप्टेंबर, २०२५
Home
/
Unlabelled
/
तालुक्यातील ग्रामरोजगार साहाय्यकांचा प्रशिक्षणावर बहिष्कार ; कामबंद आंदोलनाला वेग
तालुक्यातील ग्रामरोजगार साहाय्यकांचा प्रशिक्षणावर बहिष्कार ; कामबंद आंदोलनाला वेग
शिरपूर प्रतिनिधी :- शिरपूर तालुक्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 1 सप्टेंबरपासून सुरू केलेले बेमुदत कामबंद आंदोलन अधिक तीव्र केले आहे.11 सप्टेंबर 2025 रोजी पंचायत समिती कार्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमावर ग्रामरोजगार सहाय्यकांनी बहिष्कार टाकत गेटवर घोषणाबाजी करून शासनाचा निषेध व्यक्त केला.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या ग्रामरोजगार सहाय्यकांच्या मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. यामध्ये विशेषतः 3 ऑक्टोबर 2004 रोजीच्या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. याबाबतचे निवेदन शिरपूर गटविकास अधिकाऱ्यांना 1 सप्टेंबर रोजी संघटनेच्या वतीने देण्यात आले होते. मात्र शासनाने अद्याप कोणतीही सकारात्मक भूमिका न घेतल्यामुळे ग्रामरोजगार सेवक आक्रमक झाले आहेत.
कामबंद आंदोलनामुळे तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची सर्व कामे ठप्प झाली आहेत. अशा स्थितीतही शिरपूर गटविकास अधिकाऱ्यांनी विविध कामांसाठी 11 सप्टेंबर रोजी प्रशिक्षण आयोजित केले होते. परंतु, ग्रामरोजगार साहाय्यकांनी सभागृहात प्रवेश न करता सरळ गेटवर घोषणाबाजी सुरू केली आणि प्रशिक्षणावर बहिष्कार टाकत आंदोलन सुरूच ठेवले.असून “जोपर्यंत शासन आमच्या मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत बेमुदत कामबंद आंदोलन सुरू राहील.”या निर्णयावर ठाम आहेत
या आंदोलनामुळे शासनाच्या ग्रामीण विकासविषयक कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून शासनाने तातडीने या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. या आंदोलनावेळी शिरपूर तालुक्यातील सर्वच ग्रामरोजगार सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर प्रतिनिधी :- दोन मोटारसायकलची समोरासमोर टक्कर होऊन चोपडा तालुक्यातील घुमावल येथील एक जण जागीच ठार झाल्याची घटना 12 रोजी दुपारी 12 वाज...
-
तरुणी बेपत्ता शेतातून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा संशय अमळनेर तालुक्यातील कळंबु येथे शेतात कामासाठी गेलेली १५ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा