Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १२ सप्टेंबर, २०२५
कळंबू येथिल पांझरा नदीत रेल्वे पुलाखालून वाळी उपसा सुरू
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात कळंबू रेल्वे पुलाखालून पांझरा नदीतून अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू आहे. त्याचा गंभीर परिणाम भूगर्भजल पातळीवर होणार आहे. त्यामुळे ही अवैध वाळू वाहतूक भविष्यातील दुष्काळाला आमंत्रण देणारी ठरणार आहे. तोवर ही खिसेभरु सरकारी बाबू दुसरीकडे तुंबड्या भरायला निघून जातील.
अमळनेर तालुक्यातील तापी, पांझरा, बोरी नदीसह छोट्या नदीनाल्यातून आतापर्यंत कधी न झालेला प्रचंड वाळू उपसा सुरू आहे. वाळूच्या पैशांनी तोंड दाबल्यामुळे कारवाईला कचरणारे इतके निगरगठ्ठ अधिकारी पहिल्यांदाच तालुक्याने पाहिले असून हे अधिकारी तर तुंबडी भरून निघून जातील. मात्र आधीच अवर्षणग्रस्त असलेल्या तालुक्याला याचे गंभीर परिणाम भोगावे लागल्यास नवल वाटणार नाही. एकीकडे तालुक्यातील सामाजिक संस्था व चळवळी नदी नाल्यातील गाळ काढून भूगर्भजल पातळी वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र तालुक्यातील जीवनदायिनी असलेल्या तिन्ही नद्यातील वाळू उपाश्यामुळे भूगर्भजलात मोठी घट येणार आहे.
जेव्हा अवैध वाळू उपसा होतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम भूगर्भजलावर होतो. नदीत आणि नदीकिनाऱ्यावर असलेली वाळू पावसाचे पाणी जमिनीच्या आत झिरपवते. वाळू उपसामुळे जमिनीत पाणी झिरपत नाही, परिणामी भूगर्भजल कमी होते. ग्रामीण भागात पिण्याचे व सिंचनाचे पाणी विहिरींवर अवलंबून असते. वाळूचोरीमुळे त्या कोरड्या पडतात. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या परिणामांना हे खिसेभरु अधिकारी कारणीभूत असून त्यांच्या आशीर्वादाने निर्भयपणे सुरू असलेली वाळू वाहतूक भविष्यातील दुष्काळाला आमंत्रण देणार आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर प्रतिनिधी :- दोन मोटारसायकलची समोरासमोर टक्कर होऊन चोपडा तालुक्यातील घुमावल येथील एक जण जागीच ठार झाल्याची घटना 12 रोजी दुपारी 12 वाज...
-
तरुणी बेपत्ता शेतातून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा संशय अमळनेर तालुक्यातील कळंबु येथे शेतात कामासाठी गेलेली १५ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्...




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा