Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १३ सप्टेंबर, २०२५

बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबल व किशोर कुमार यांचे फॅन म्हणून प्रसिद्ध असलेले पोलीस गायक श्री.राजेश जी राजगुरे यांचे आज दुःखद निधन



बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबल व किशोर कुमार यांचे फॅन म्हणून प्रसिद्ध असलेले पोलीस गायक श्री.राजेश जी राजगुरे यांचे आज दुःखद निधन झाले.

त्यांनी आपल्या सुरेल आवाजातून आणि मनमिळावू स्वभावातून अनेकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनामुळे पोलीस दल, संगीतप्रेमी, मित्रपरिवार आणि संपूर्ण समाजात शोककळा पसरली आहे.

त्यांची अंतिम यात्रा त्यांच्या राहत्या घराहून निघून हिंदू स्मशानभूमी येथे पोहचली, जिथे शासकीय इतमामात अंत्यविधी व शासकीय सलामी देण्यात आली.

या अंत्यविधीस बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. तांबे साहेब,खामगाव येथील पोलीस निरीक्षक मा. श्रेणिक लोढा साहेब, शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार मा.नितीन पाटील साहेब, तसेच भोई समाज बांधव, नातेवाईक,फॅन्स, कर्मचारी मित्रपरिवार व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वांनी राजेश राजगुरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

"कर्तव्य आणि कला यांचा सुंदर संगम असलेले व्यक्तिमत्व हरपले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध