Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १८ सप्टेंबर, २०२५

दै.खान्देश विशेषचे संपादक पवन बडगुजर यांना वल्लभभाई पटेल हिंदुरत्न पुरस्कार जाहीर



 
शिरपूर/ प्रतिनिधी येथील दै.खान्देश विशेषचे संपादक पवन उर्फ गोपाल गंगाराम बडगुजर यांना भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदूरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.पुणे येथे येत्या ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या समारंभात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
  
पुणे येथील डॉ. मणीभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट तर्फे दरवर्षी राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक सेवा समर्पित भावनेने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार दिले जातात.सन २०२५ या वर्षासाठी सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात काम करीत असलेले शिरपूर येथील दै.खान्देश विशेषचे संपादक पवन उर्फ गोपाल गंगाराम बडगुजर यांची या पुरस्कारासाठी ट्रस्टचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाज सेवक,प्रवचनकार,हिंदूरत्न पुरस्कार विजेते डॉ.रवींद्र भोळे यांनी निवड केली आहे. राष्ट्र भक्तीची ज्योत तेवत ठेवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून ठेवणे हा संस्थेचा हेतू आहे.पुरस्कार जाहीर झाल्याने पवन बडगुजर यांचे विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध