Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २ सप्टेंबर, २०२५
मुलानेच बापाच्या डोक्यात हातोडी टाकून खून केला
अमळनेर : मुलाने सख्ख्या बापाच्या डोक्यात लोखंडी हातोडी टाकून त्याचा खून केल्याची घटना ३१ रोजी रात्री साडे नऊ वाजेपुर्वी अमळनेर शहरात शिरूड नाका परिसरात ३६ खोली भागात घडली.*
राजेंद्र दत्तात्रय रासने वय ६५ हे जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याची माहिती ऋत्विक भामरे याने पोलिस अमोल पाटील व जितेंद्र निकुंभे याना सांगितली. लागलीच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे , सपोनि सुनील लोखंडे ,पोलिस उपनिरीक्षक शरद काकळीज , समाधान गायकवाड ,हेडकॉन्स्टेबल लक्ष्मीकांत शिंपी , मिलिंद सोनार , नितीन मनोरे ,विनोद संदानशिव , प्रशांत पाटील यांनी भेट दिली. राजेंद्र रासने याला दवाखान्यात हजर केले असता त्याला मयत घोषित करण्यात आले. पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांना विचारले असता राजेंद्र याचा मुलगा भूषण राजेंद्र रासने यानेच त्याच्या डोक्यात लोखंडी हातोडी टाकून मारले असे सांगण्यात आले. फॉरेन्सिक पथकाने घटनस्थळवरून काही नमुने घेतले व लोखंडी हातोडी जप्त करण्यात आली. अमोल पाटील यांच्या फिर्यादीवरून भूषण राजेंद्र रासने वय ३६ याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज करीत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर प्रतिनिधी : तालुक्यातील गांधली येथील १० रोजी बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह १२ रोजी विहिरीत आढळून आल्याची घटना उघडकीस आली. गांधली ये...
-
अमळनेर प्रतिनिधी :- दोन मोटारसायकलची समोरासमोर टक्कर होऊन चोपडा तालुक्यातील घुमावल येथील एक जण जागीच ठार झाल्याची घटना 12 रोजी दुपारी 12 वाज...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा