Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५

दोन गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या गांधलीपुरा येथिल तरूणाला अटक


अमळनेर प्रतिनीधी:- शहरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने दोन गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या गांधलीपुरा भागातील अनिल मोहन चंडाले याला एलसीबी आणि स्थानिक पोलिसांनी घेराव घालून अटक केल्याची घटना २५ रोजी मध्यरात्री १२ वाजून १० वाजेच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयाजवळ इंदिरा भुवन जवळ घडली
एलसीबी चे हेडकॉन्स्टेबल विष्णू बिऱ्हाडे , दीपक माळी ,रवींद्र पाटील हे अमळनेर शहरात रेकॉर्ड वरील गुन्हेगार तपासत असताना त्यांना पोलीस उपनिरीक्षक सोपान मोरे यांनी कळविले की यावल येथील युवराज उर्फ युवा राजू भास्कर यांच्याकडे एक गावठी पिस्तुल आणि दोन कडतुस सापडले आहे. 

चौकशीत त्यांनी सांगितले की भूषण कैलास सपकाळे रा भुसावळ आणि समाधान बळीराम निकम रा पाचोरा यांनी तीन पिस्तुल व सहा काडतुसे उमर्टी येथून आणले होते.भूषण ने ते युवराज भास्कर याला विकले आणि त्याने दोन पिस्तुल व चार काडतुसे अमळनेर येथील अनिल मोहन चंडाले याला विकले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम याना कळवले. त्यांनी एलसीबी पोलिसांसह पोलीस निरीक्षक शरद काकळीज ,संतोष नागरे, नितीन मनोरे याना अनिल चंडाले याला पकडण्यासाठी पाठवले. ग्रामीण रुग्णालयाजवळ इंदिरा भुवन जवळ अंधारात तो उभा असताना सर्व पोलिसांनी त्याला घेराव घालून त्याची कोंडी केली. त्याला पकडून त्याच्याजवळून दोन गावठी पिस्तुल आणि चार काडतुस असा ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अनिल व युवराज यांच्याविरुद्ध शस्त्र कायदा कलाम ३ ,७ ,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध