Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५

सामाजिक कार्यातील तळमळ पाहून तरुण उद्योजक शरद पाटील यांचा लोकशाही न्यूज चॅनलचा महाराष्ट्र रत्न सन्मान पुरस्काराने गौरव!!



धुळे जिल्ह्यातील तरुण उद्योजक अशी नवी ओळख निर्माण करून सामाजिक कार्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या शिंदखेडा तालुक्यातील सार्वे येथील सरपंच शरद पंडित पाटील यांना मुंबई येथील लोकशाही न्यूज चॅनल यांच्यातर्फे महाराष्ट्र रत्न सन्मान या पुरस्काराने गौरविण्यात आले.या पुरस्काराने त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव झाला असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे.
     
लोकशाही न्यूज चॅनल हे महाराष्ट्रातील नामांकित चॅनल आहे.त्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना विशेष पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यासाठी नाशिक येथे २८ सप्टेंबर रोजी हॉटेल एक्स्प्रेस इन येथील एक्स्प्रेस रॉयल सभागृहात आयोजित शानदार सोहळ्यात शरद पाटील यांना राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते महाराष्ट्र रत्न सन्मान हा पुरस्कार देण्यात आला.
शाल,श्रीफळ,सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.यावेळी लोकशाही न्यूज चॅनल संपादक विशाल पाटील,ज्येष्ठ पत्रकार विशाल ठाकूर आदी उपस्थित होते.या पुरस्काराने श्री.पाटील यांचा विशेष सन्मान झाला आहे.
   
शिंदखेडा तालुक्यात असलेल्या सार्वे या लहानशा गावात त्यांनी आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली.त्यांनी शेतकरी,
तरुण,महिला यांना न्याय मिळावा यासाठी कामगिरी केली.त्यात त्यांनी कसलाही स्वार्थ पाहिला नाही.केवळ समाजाची सेवा करण्याच्या चांगल्या हेतूने ही कामगिरी सुरू ठेवली.त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन गावकऱ्यांनी त्यांना गावाचे नेतृत्व करण्याची गळ घातली.ग्राम पंचायत निवडणुकीत यश संपादन केल्यावर सर्वांच्या इच्छेने सरपंच पदाची जबाबदारी अंगावर घेत विकासाला प्राधान्य दिले.गावात विविध प्रकारच्या शासकीय योजनेतून कामे केली आहेत.एक खेडे गाव कसे विकसित आहे असा आदर्श निर्माण करण्यासाठी शरद पाटील यांचा कामाचा झपाटा सुरू आहे.
   
त्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दोंडाईचा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक म्हणून काम केले.त्यात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.
   
व्यवसायात पदार्पण करून यशस्वी मजल गाठली आहे.त्यांनी अंबिका पेट्रोलियम,  अंबिका स्टोन क्रशर हे उद्योग सुरू केलेत
त्यांनतर त्यांनी काही दिवसांपूर्वी नयन पेट्रोलियम या नवीन फर्मची मुहूर्तमेढ रोवली.सार्वे या खेडेगावातून पुढे आलेल्या शरद पंडित पाटील यांनी अल्पावधीत राजकीय,सामाजिक,व्यावसायिक क्षेत्रात घेतलेली भरारी निश्चित थक्क करणारी आहे.

महाराष्ट्र रत्न सन्मान पुरस्काराने त्यांच्या कार्याला हातभार लागला असून त्यातून त्यांचा नावलौकिक वाढला आहे.
लोकशाही न्यूज चॅनल यांनी महाराष्ट्र रत्न पुरस्कारासाठी माझी निवड केली.हा पुरस्कार मिळाल्याने मनस्वी आनंद झाला आहे.मी प्रामाणिक भावनेतून केलेल्या कामाचा हा गौरव आहे.सामान्य माणसाच्या हक्कासाठी काम करण्याचा प्रयत्न यापुढे देखील करीत राहणार आहे.
              शरद पंडित पाटील 
                    उद्योजक
       
गरीब,श्रीमंत दरी दूर करावी शिक्षण क्षेत्रात सध्या गरीब श्रीमंत असा भेद सुरू आहे.शिक्षण घेण्याचा अधिकार गरिबांना देखील आहे.त्यामुळे ही  दरी कायमची दूर करण्यासाठी सरकारने काम करावे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी सरकारी शाळेत शिक्षक नाहीत.गरीब घरातील विद्यार्थी काय शिकणार? शासनाने महागाईच्या काळात सरकारी शाळा कशा टिकून राहतील यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया पुरस्कार स्वीकारल्यानंतर शरद पाटील यांनी व्यक्त केली.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध