Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ३० सप्टेंबर, २०२५
निंभोरा पोलिसांचे भरतीपूर्व मार्गदर्शन शिबिर संपन्न...!
रावेर प्रतिनिधी:- भिमराव कोचुरे/
रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस दलाने जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा परिसरातील ग्रामीण भागातील युवकांना पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन शिबिर कृषी तंत्र विद्यालयात घेण्यात आले.
यावेळी सर्वप्रथम मार्गदर्शन शिबिराचे अध्यक्ष फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांनी सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी स.पो.नी हरिदास बोचरे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. व मान्यवरांचे स्वागत पीएसआय अभय ढाकणे यांनी केले.
मार्गदर्शन शिबिराला प्रमुख वक्ते म्हणून रावेर येथील वैभव देशमुख व वाघोड येथील दिनेश चौधरी तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल बडगुजर यांनी युवकांना मार्गदर्शन करताना सांगितले की सर्व युवकांनी आत्मप्रेरित अभ्यास करत यश संपादन करण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे सांगितले.पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन शिबिरात सुमारे २०० युवक युवतीनी सहभाग घेतला यावेळी लेखी सराव पेपर घेण्यात आला यात प्रथम क्रमांक योगेश सदाशिव कचरे द्वितीय धीरज रतिलाल महाजन व तृतीय वैभव कडू सावळे यांनी पटकावला. या मार्गदर्शन शिबिराचे नियोजन फौजदार ममता तडवी, पो .का. प्रभाकर ढसाळ, प्रशांत चौधरी व पोलिसांनी केले आभार प्रदर्शन दिपाली पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी निंभोरा पोलीस दलातील सर्व पोलीस कर्मचारी होमगार्ड बांधव व कृषीतंत्र विद्यालयाचे अध्यक्ष प्रल्हाद बोंडे व विद्यालयाचे शिक्षकवृंद यांनी घेतले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा