Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ३० सप्टेंबर, २०२५
Home
/
Unlabelled
/
निंभोरा येथील गरजूंना त्वरित प्लॉट वितरित करावे, आमदारांकडे शरद तायडे यांनी केली मागणी...!
निंभोरा येथील गरजूंना त्वरित प्लॉट वितरित करावे, आमदारांकडे शरद तायडे यांनी केली मागणी...!
रावेर /भिमराव कोचुरे प्रतिनिधी/
रावेर तालुक्यातील निंभोरा येथील गरजूंना त्वरित प्लॉट द्यावेत, अशी मागणी शरद तायडे यांनी आ. अमोल जावळे यांच्याकडे केली आहे.
निंभोरा बुद्रुक येथील गट क्रमांक लावली ७३० मधील लाभार्थी यादी ग्रामपंचायतीने होती. त्या अनुषंगाने रावेर पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील इंजिनिअर प्रकाश वानखेडे हे निंभोरा गावामध्ये ले-आउट टाकण्यासाठी आले होते. या वेळी काही समाजकंटकांनी त्यांना धमकवण्याचे काम केले होते. त्यामुळे ते प्रकरण पेंडिंग पडले होते. या संदर्भात आ. अमोल जावळे यांची भेट घेऊन त्यांना शरद तायडे यांनी निवेदन दिले. याबाबत रावेर पंचायत
समितीचे बीडीओंना फोन लावून चर्चा केली. तर निंभोऱ्यातील प्लॉट वितरणचा विषय मार्गी लावा, अशा त्यांनी सूचना केल्यात. या वेळी महेश चौधरी, कमलाकर तायडे यांनी ही आ. अमोल जावळे यांना निंभोऱ्यातला विषय मार्गी लावून द्या, असे सांगितले. तर आमदारांनी त्यास होकार दिला आहे, असे शरद तायडे यांनी सांगितले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा