Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३० सप्टेंबर, २०२५

बुलढाणा जिल्हा पिंप्रीगवळी येथे शिवशक्ती दुर्गा मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न.



पिंप्रीगवळी - शिवशक्ती दुर्गा मंडळाच्या वतीने नवरात्री उत्सवानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित केले होतें.गावांत सात ते आठ मंडळ असुन प्रत्यक मंडळाच्या वतीने दररोज भजन, कीर्तन, जागरण, दांडिया, असे कार्यक्रम घेतले जातात. शिवशक्ती दुर्गा मंडळाचे वतीने दरवर्षी सामाजिक, सांस्कृतिक,रुक्षारोपण,सारखे उपक्रम राबविले जातात.व दुर्गादेवी, गणपती मिरवणूक मोठे डीजे किंवा बँड न लावता पारंपारिक लेझीम व ढोल ताशे घेऊन आदर्श पद्धतीने केले जाते.या वर्षी बीजेपी उपतालुका अध्यक्ष सुनिल भामद्रे व शिवशक्ती दुर्गा मंडळ अध्यक्ष विठ्ठल क्षीरसागर,उपाध्यक्ष समाधान सुरळकर, ज्ञानेश्वर माळूकर, माजी पं.सदस्य. ईश्वरसिंग पवार  यांचे संकल्पनेतून शिबिराचे आयोजन केलेले होतें.या कार्यक्रमाला बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय येथील शासकीय रक्तपेढी विभातर्फे रक्त संक्रमण अधिकारी  डॉ.श्लोका देशपांडे, पर्यवेक्षक विनोद झगरे,रक्तपेढीतंत्रज्ञ पुजा बनकर,
शीतल इंगळे, समुपदेशक धनंजय गोतमारे, आकाश हिवाळे, समाधान खुर्दे यांचे पथक रक्त संकलनासाठी आले होतें. 

आलेल्या पाहुण्यांचे स्वागत माजी सैनिक श्रीकृष्ण सुरळकर, ऍड सुनिल इंगळे, डी.एन. पाटील, ग्रामपंचायत सचिव अश्विन शेळके, मधुकर क्षीरसागर, नितीन खराटे, विनोद पवळे यांनी केले.आज एकविसाव्या शतकात विज्ञान कितीही पुढे गेलेलं असलं तरी कृत्रिम रक्त तयार करू शकलं नाही.रक्तासाठी जीवन मरणाच्या रेषेवर असलेल्या व्यक्तीला जेव्हा वेळेत रक्त मिळते तेव्हा त्याला पुनर्जन्म मिळतो.तेच मोठं पुण्यकर्म रक्तदान केल्यामुळे घडत. म्हणून रक्तदान हेच श्रेष्ट दान आहे. नवरात्री उत्सवात काही रक्तदात्याचे नऊ दिवस उपवास असुन सुद्धा त्यांनी रक्तदान केले, तसेच विशेष म्हणजे सौं रीना ज्ञानेश्वर माळूकर, सौं पुनम अशोक लोहार या महिलांनी व रोशन शहा, आणि मकसूद शहा या सख्ख्या मुस्लिम भावांनी जाती धर्माच्या भिंती तोडून हिंदूंच्या पवित्र नवरात्री उत्सवात रक्तदान केल्यामुळे सर्व स्थरावर कौतुक होतं आहे.

तसेच समाधान सुरळकर, विठ्ठल क्षीरसागर, ग्रा. पं सदस्य राजु सुरळकर, उमेश गोरे, भगवान वाघ, स्वप्नील भामद्रे, श्रीकांत मंगळकर, रोशन शहा, राहुल अहेर, उमेश पडोळकर, ग्रा. पं सचिव अश्विन शेळके, बीजेपी अ. ज. तालुका अध्यक्ष अनिल पवार, दिपक भामद्रे, अनिल माळूकर, मकसूद शहा, वैभव मंगळकर, नारायण मोहाळे, अमोल शेडगे, देविदास सुरळकर, अमोल अहेर, कैलास सुरळकर, विनोद निवृत्ती पाटील, अतुल खर्चे, किशोर सुरळकर, नवल इंगळे, रितेश कुलकर्णी, अशा एकूण २८ लोकांनी रक्तदान केले.या कर्यक्रमाला गावातील बरेचशे महिला पुरुष उपस्थित होतें.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध