Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २३ सप्टेंबर, २०२५

श्रीमती.एच.आर.पटेल कला महिला महाविद्यालयात "राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा"



शिरपूर प्रतिनिधी /श्रीमती.एच.आर.पटेल कला महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागच्या वतीने राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा’ करण्यात आला.या  कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.शारदा शितोळे होते.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते तथा मार्गदर्शक डॉ. श्रीकांत वाडीले (योग विद्या धामचे प्रमुख) होते. 
डॉ.श्रीकांत वाडीले यांनी आयुर्वेदाचे महत्व सांगताना प्राचीन काळापासून आपल्या ऋषीमुनींनी वनऔंषधीचा शोध लावला त्याचा मानवी आरोग्यावर चांगला परिणाम होतो हे आपल्या आचरणातून सिद्ध केले. तेव्हा पासून आयुर्वेदाचे महत्व समाजातील प्रत्येक घटका पर्यंत पोहचविण्याचे काम विविध माध्यमातून केले जात आहे. 

आज ही भारतात आयुर्वेदाला महत्वाचे स्थान आहे.भारताच्या आयुष मंत्रालयाच्या आदेशावरून हा दिवस साजरा केला जात आहे. याचे कारण असे की आयुर्वेदाचे महत्व सर्वसामान्य लोकांपर्यंत राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यामतून पोहचले पाहिजे. हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. अलीकडे  मानवाच्या जीवनशैलीत बदल झाल्यामुळे आयुर्वेदा पेक्षा इतर उपचार व्यवस्था झटपट आराम देतात त्याकडे लोकांचा कल वाढलेला आहे.आयुर्वेद म्हणजे आयुष्याकडे पाहण्याचा वेद असे त्यांनी आयुर्वेदाचे महत्व सांगितले. 23 सप्टेंबर हा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून भारतभर साजरा केला जातो. कारण आयुर्वेदाची देवता धन्वंतरी म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी हा दिवस साजरा केला जात होता. परंतु भारतीय हिंदू पंचांगामध्ये तारखांमध्ये फरक पडत असल्यामुळे 23 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून साजरा होऊ लागला. कारण 23 सप्टेंबरला समान दिवस समान रात्र  असते. या दिवसाचा जसा समतोल आहे. 

तसा मानवाच्या आरोग्याचा समतोल असला पाहिजे असे डॉ.श्रीकांत वाडीले यांनी आपल्या व्याख्यानातून सांगितले.अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ.शारदा शितोळे यांनी विद्यार्थिनींना आयुर्वेदाचे महत्त्व सांगताना ऋतुचक्रातील बदल व मानवी आरोग्यावर होणारे परिणाम याविषयी माहिती दिली. त्यांनी ऋतुचक्रानुसार मानवाचा आहार असला पाहिजे तरच मानवाचे आरोग्य चांगले राहील, असे मार्गदर्शन करतांना सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.आर.एम.वाडीले यांनी केले. तर सूत्र संचलन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.भास्कर खैरनार यांनी केले. आभार कु. कोमल पारधी यांनी मानले. कार्यक्रमास सर्व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री जगदीश चौधरी,दक्षा शर्मा, तृप्ती जोशी, श्रीमती,अनिता धनगर,राहुल पगारे, नानाभाऊ सोनवणे, अजय गोयल यांनी सहकार्य केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध