Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २४ सप्टेंबर, २०२५

पतीच्या अनैतिक संबंधातून महिलेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने पाच संशयितांवर गुन्हा दाखल


  
शिरपूर/ प्रतिनिधी तालुक्यातील भाटपुरा येथे पतीचे अनैतिक संबंध असल्याने त्यास विरोध करीत असल्याने पती आणि सासरकडील मंडळींच्या मानसिक व शारीरिक अत्याचारास कंटाळलेल्या महिलेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.या सामाजिक घटनेने खळबळ उडाली आहे.थाळनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पतीसह पाच संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.
   
भाटपुरा गावातील संशयित सुभाष गोकुळ गुजर यास दारूचे व्यसन आहे.तसेच त्याचे एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय त्याच्या मयत पत्नीला होता.त्यावरून दोघांमध्ये सतत वाद,भांडण सुरू होते.तिचा पतीच्या अनैतिक संबंधाना विरोध असल्याने महिलेचा शारीरिक व मानसिक छळ सुरू होता.तसेच तिला मारहाण केली जात होती.महिलेच्या पतीच्या घरातील लोकांनी त्यास चिथावणी दिल्याने संगनमत करून महिलेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने अखेर महिलेने १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजता राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर जीवनयात्रा संपविली.
  
या सामाजिक घटनेने खळबळ माजली असून पतीला त्याच्या अनैतिक कृत्य करण्यास पाठबळ देण्याच्या प्रयत्नातून विवाहित महिलेस आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलावे लागले असल्याची संतप्त प्रतिक्रिया परिसरात उमटली आहे.
  
मयत महिलेवर अंत्यसंस्कार केल्यानंतर संजय शिवाजी पाटील ( रा. जापोरे,ता शिरपूर) यांनी थाळनेर पोलिस ठाण्यात २१ सप्टेंबर रोजी फिर्याद दिली. सर्व आरोपी अद्याप  फरार सर्व रा.भाटपुरा यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम १०८,११५
(२),३५२,३५१(२),३५१(३),३(५) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हर्षल पाटील करीत आहेत.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध