Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २४ सप्टेंबर, २०२५

नंदुरबारमध्ये आदिवासींच्या मोर्चाला हिंसक वळण, गाड्यांची तोडफोड, जोरदार गदारोळ



नंदुरबार प्रतिनिधी / नंदुरबारमधून मोठी बातमी समोर येत आहे. नंदुरबारमध्ये आदिवासी समाजाच्या मोर्चाला अचानक हिंसक वळण लागलं. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही आंदोलकांनी वाहनांची तोडफोड केली. यावेळी गर्दीला पांगण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. पण यावेळी काही आक्रमक आंदोलकांनी पोलिसांच्या दिशेला दगडफेक केली. यामुळे परिसरातील वातावरण तापलं आहे. खरंतर नंदुरबारमध्ये आज आदिवासी समाजाच्या एका तरुणाच्या खून प्रकरणात शहरात बंदची हाक देण्यात आली. या खूप प्रकरणातील आरोपींना अटक व्हावी या मागणीसाठी आदिवासी संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. पण हा मोर्चा अंतिम टप्प्यावर असताना अचानक मोर्चाला हिंसक वळण लागलं.

पूर्ण मोर्चा शांततेत पार पडल्यानंतर काही उपद्रव्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली. या उपद्रव्यांना रोखण्याचे पोलिसांनी प्रयत्न केले. पण परिस्थिती आणखी चिघळली. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि जमावाला पांगवण्यासाठी अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडल्या. यानंतर पोलिसांकडून गर्दी पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. तसेच सामाजिक कार्यकर्ते मालती वळवी देखील जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींचा संख्या वाढण्याची शक्यता आहे. पोलीस सध्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत.

नेमकं काय घडलं?

आदिवासी युवकाच्या खुनाच्या निषेधार्थ विविध संघटनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हास्तरीय मोर्चा काढण्यात आला होता. मात्र मोर्चा पार पडल्यानंतर काही उपद्रव्यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली. यावेळी पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. तसेच सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेत पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते जखमी झाली आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. या घटनेनंतर नंदुरबार शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले

मोर्चा शांततेत पार पडल्यानंतर काही उपद्रव्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली. यात मोठ्या प्रमाणावर गाड्यांची नुकसान झाले आहे. काहींनी यावेळी पोलिसांवर दगडफेक केली. या घटनेची व्याप्ती मोठी असून यात नेमके किती वाहनांचे नुकसान झाले आहे ते कळू शकले नाही. घटनेनंतर नंदुरबार शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलिसांचे आवाहन

नंदुरबार शहरात शांततेचे वातावरण आहे. मोर्चा शांततेत निघावा, असे आवाहन केले असताना काही उपद्रव्यांनी शासकीय आवारातील वाहनांची तोडफोड केली. तसेच पोलिसांवर दगडफेक केली म्हणून अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडत, सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. युवकाचा खून प्रकरणी पोलीस प्रशासन काम करत असून त्यांना अटक करण्यात आली आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच कुणीही कायदा हातात घेऊ नये. अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध