Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १४ सप्टेंबर, २०२५
शिरपूर तालुक्यात खळबळ: कोडीद येथे नाल्यात तरुणाचा निर्घृण खून
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर तालुक्यातील कोडीद गावाजवळच्या नाल्याकाठी एका 26 वर्षीय तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली, जेव्हा नाल्याच्या काठावर एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याची माहिती शिरपूर तालुका पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता, मृतदेहाची पाहणी करताना त्याच्या पोट आणि डोक्याच्या मागच्या बाजूला धारदार शस्त्राने गंभीर वार केल्याचे दिसून आले.
मृत तरुण तेल्यामहू गावाचा पोलिसांनी केलेल्या चौकशीत मृत तरुणाची ओळख नानासिंह सहेजा पावरा (वय 26, रा. तेल्यामहू, पो.कोळीद, ता. शिरपूर) अशी पटली आहे.नानासिंह हा व्यवसायाने शेतकरी होता. काल सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास तो शेवटचा दिसला होता. त्यानंतर आज सकाळी त्याचा मृतदेह आढळल्याने पोलिसांनाही धक्का बसला आहे.
फॉरेन्सिक पथकाकडून पुरावे गोळा
या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी धुळ्याहून फॉरेन्सिक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पथकाने घटनास्थळावरील रक्ताचे नमुने गोळा केले असून, इतर महत्त्वाचे पुरावे शोधण्याचे काम सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, त्यामुळे खुनामागचे नेमके कारण आणि आरोपींविषयी कोणतीही ठोस माहिती पोलिसांकडून मिळू शकली नाही. या घटनेमुळे संपूर्ण कोडीद गाव हादरले असून परिसरात भीतीचे वातावरण आहे तसेच सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार हे करीत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
तरुणी बेपत्ता शेतातून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा संशय अमळनेर तालुक्यातील कळंबु येथे शेतात कामासाठी गेलेली १५ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्...
-
अमळनेर तालुक्यातील गांधली येथील तरुणीच्या मृत्यू प्रकरणी तिच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. गांधली येथील ज...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा