Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १८ डिसेंबर, २०२५

तरुणी बेपत्ता शेतातून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा संशय



तरुणी बेपत्ता  शेतातून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा संशय
अमळनेर 
तालुक्यातील कळंबु येथे शेतात कामासाठी गेलेली १५ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे.  एक तरुणी (वय १५ वर्षे ५ महिने) ही १६ डिसेंबर रोजी सकाळी आईसोबत कापूस वेचण्यासाठी शेतात गेली होती. दुपारी आई पाणी भरण्यासाठी दुसऱ्या शेतात गेल्यानंतर तरुणी ही बकऱ्या चारण्यासाठी शेतातच थांबली होती.

दुपारी शेतात शोध घेतला असता तरुणी आढळून आली नाही. घटनास्थळी तिची चप्पल सापडली असून गावात व परिसरातील शेतात शोध घेऊनही ती मिळून आली नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने फूस लावून अल्पवयीन तरुणीला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाची फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध