Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १२ ऑक्टोबर, २०२५
Home
/
Unlabelled
/
धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतिने आयोजित आढावा बैठक अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष अँड नाझेर काझी यांच्या उपस्थितीत संपन्न..!
धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतिने आयोजित आढावा बैठक अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष अँड नाझेर काझी यांच्या उपस्थितीत संपन्न..!
महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष अँड नाझेर काझि साहेब शुक्रवार दिनांक 10/ऑक्टोबर/2025 रोजी धुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती , महानगर पालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, निवडणूकीच्या संदर्भात आढावा बैठकीच्या निमित्ताने धुळे नगरीत आगमन झाले या प्रसंगी त्यानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला व आढावा घेतला तसेच मुस्लिम समाज च्या समस्या बद्दल चर्चा केली
सायंकाळी 5 वाजता वरजाई रोड शाह जमात हॉल मध्ये त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले अल्पसंख्याक, महिला, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, प्रदेशाध्यक्ष अँड नाझेर काझि साहेब यांनी मार्गदर्शन करतानां सांगितले की अल्पसंख्यांक समाजासाठी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री ना.अजित दादा पवार साहेबांनी केलेल्या कामाची ओळख करून दिली तसेच महाराष्ट्रातील अल्पसंख्याकांच्या सर्वागीण विकासासाठी त्यांच्या नेतृत्वात महत्वपूर्ण पावले उचलली जात आहे
अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न व शासनाकडून असलेल्या अपेक्षा या बद्दल माहिती दिली, जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.सुरेश आण्णा सोनवणे होते, प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ. फारूक शाह साहेब, माजी आमदार शरद पाटील सर, जिल्ह्याचे नेते शामकांत जी सनेर, जोसेब आण्णा मलबारी, सुनिल तात्या नेरकर, चौधरी , राष्ट्रीय सरचिटणीस अल्पसंख्यांक विभाग ताहीर बेग मिर्झा ,अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष अक्रम भाई तेली , युवक चे जिल्हाध्यक्ष सुमित भाऊ पवार, महिला अध्यक्ष संजिवनीताई गांगुर्डॅ, युवा नेते शहबाज शाह , नगरसेवक मुक्तार भाई बिल्डर, डॉ. सरफराज भाई अन्सारी, रईस भाई काझी, दिपा ताई, अल्पसंख्यांक महिला अध्यक्ष शगुफ्ता मिर्झा , मसिरा अन्सारी, नजीर शेख, फातीमा शेख, महेमुद भाई शेख हारुन शेठ बरकत भाई यासीन शेख होते जिल्हाध्यक्ष सुरेश आण्णा यांनी मनोगत व्यक्त करतानां सागितले की येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे जि.प.सदस्य, पंचायत सदस्य, नगरसेवक जास्तीत जास्त निवडुन आणण्याचा मानस आहे तसेच माजी आमदार शरद पाटील सर यांनी धुळे जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती बद्दल माहिती दिली प्रस्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक चे धुळे जिल्हाध्यक्ष नाजीम भाई शेख यांनी प्रस्ताविक मांडताना धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद, धुळे महानगर पालिका, शिरपूर नगरपरिषद, दोंडाईचा नगरपरिषद, शिंदखेडा नगर पंचायत, साक्री नगर पंचायत, पिंपळनेर नगर पालिका, निजामपुर ग्राम पंचायत अल्पसंख्यांक समाजातील किती सदस्य मागील निवडणुकीत निवडून आले होती याची माहीती दिली व येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री ना.अजित दादा पवार साहेबांनी अल्पसंख्यांक समाजा विकासासाठी जे कार्य सुरू आहे
त्याची परत फेड करण्या करीता निवडणुकीत जास्तीत जास्त जि.प.सदस्य व नगरसेवक निवडून द्यावे अशी जिल्ह्यातील अल्पसंख्याक पदाधिकाऱ्यांना सांगितले, जिल्हा अल्पसंख्याक कार्याध्यक्ष करीम भाई शाह ,उपाध्यक्ष बाबा भाई कलंदर, जिल्हा उपाध्यक्ष बेटावद चे अय्युब भाई सरचिटणीस अरबाज शेख, शिरपूर तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष जहुर भाई खाटीक, शिंदखेडा तालुका अध्यक्ष रईस भाई मन्यार, कार्याध्यक्ष अश्पाक खा , साक्री शहराध्यक्ष जुबेर भाई, दोंडाईचा शहराध्यक्ष रईस भाई शेख, कार्याध्यक्ष रियाज भाई मिर्झा.शिरपूर कार्याध्यक्ष मुस्तकीम शेख, पिंपळनेर शहराध्यक्ष उमैर भाई पठाण, अयाज भाई मिर्झा, नदीम भाई शाह, खलिल शाह, अल्पसंख्यांक महिला अध्यक्ष शगुफ्ता मिर्झा ,मसिरा अन्सारी, कार्याध्यक्ष जुनैद शेख उपाध्यक्ष नजीर शेख, फातीमा शेख, पिर महोम्मद भाई, बाबा शेख, सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाजीम भाई शेख, धुळे शहर जिल्हाध्यक्ष माजिद भाई अन्सारी यांनी केले सूत्रसंचालन एजाज भाई सैयद, यांनी तर आभार नाजीम भाई शेख यांनी मानले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा