अमळनेर प्रतिनिधी :- अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी अखेर मोठा निर्णय घेत शिवसेना – एकनाथ शिंदे गटात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. आज अमळनेर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. मुंबई येथे मंगळवारी त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार आहे.
चौधरी यांनी स्पष्टपणे सांगितले की, “अमळनेरच्या जनतेच्या हितासाठी, त्यांच्या विकासासाठी आणि स्थिर नेतृत्वासाठी मी शिंदे गटात प्रवेश करत आहे.” त्यांच्यासोबत नंदुरबार, तळोदा, शहादा येथील नगरसेवक तसेच अमळनेर येथील काही माजी नगरसेवक व कार्यकर्ते देखील शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पत्रकार परिषदेत चौधरी यांनी सध्याचे आमदार अनिल पाटील यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. “अनिल पाटील हे वाळू माफियांसारख्या अवैध धंदे चालता. व त्यांच्या अनेक अवैध व्यवसायांमुळे जनता त्रस्त झाली आहे,” असा आरोप त्यांनी केला.
तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर टीका करताना चौधरी म्हणाले, “नेता जर उमरठ असेल, तर कार्यकर्ते कसे सुसंस्कृत राहतील?” या वाक्यातून त्यांनी थेट शब्दांत पक्षाच्या आचारविचारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
या राजकीय घडामोडींमुळे अमळनेरात मोठा भूकंप घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिरीष चौधरी यांनी संकेत दिले की, माजी आमदार साहेबराव पाटील देखील लवकरच शिंदे गटात प्रवेश करू शकतात.
शेवटी, चौधरी यांनी अमळनेरच्या नागरिकांना एक संदेश देताना सांगितले की, “खूप लवकरच अमळनेरकरांना एक गोड बातमी मिळणार आहे,” आणि त्यावरून आगामी काळात काही मोठ्या राजकीय हालचाली होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा