Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ४ ऑक्टोबर, २०२५

तांदलवाडी येथील रस्त्याची दयनीय अवस्था.रस्ता दुरुस्त करण्याची वाहन धारकांची मागणी.

तांदलवाडी येथील रस्त्याची दयनीय अवस्था.रस्ता दुरुस्त करण्याची वाहन धारकांची मागणी.


रावेर तालुक्यातील तांदलवाडी सिंगत रस्त्यावर तापी नदी बॅकवॉटर नाल्यावरील पुलाजवळ 
मोठा खड्डा पडला होता सदरील खड्डयामध्ये मुरूम टाकून पसरविण्यात आला परंतु रोडरोलर द्वारे दाबला गेला नसल्याने रस्त्यावर टाकलेला मुरूम अस्तव्यस्त पसरला असून  त्यावरून वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे तसेच मोटर सायकल स्लीप होत असून गंभीर दुखापत होत असते.याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देवून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी परिसरातील वाहन धारक करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध