Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ४ ऑक्टोबर, २०२५
निंभोरा येथे दुर्गा उत्सव मिरवणुकीत गाणे का लावले यावरून वाद....
रावेर प्रतिनिधी:- भिमराव कोचुरे
रावेर तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथे दुर्गा उत्सव मिरवणुक शांततेत पार पडत असताना घरकुल परिसरातील दुर्गा उत्सवाच्या मिरवणुकीतील बँड मध्ये हे गाणे का लावले असे म्हणून काही तरुणांनी वाद व शिवीगाळ केल्याने दुर्गा उत्सव मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ संतप्त झाले होते परंतु लागलीच निंभोरा पोलीस स्टेशनचे स.पो.नी हरिदास बोचरे फौजदार अभय ढाकणे व निंभोरा पोलीस व होमगार्ड यांनी मिरवणुकीत गोंधळ घालणाऱ्या युवकांना ताब्यात घेतले. याबाबत गोविंदा गणेश जोगी निंभोरा
यांनी फिर्याद दिल्याने. तीन जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली यात
जुबेर आलमगीर खान
अर्शद शेख मुख्तार
फरदीन फिरोज खान. सर्व राहणार निंभोरा बु: (घरकुल परिसर)
यांना ताब्यात घेऊन निंभोरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या संदर्भात निंभोरा पोलीस अधिक तपास करीत आहे.
हा प्रकार वगळता दुर्गा उत्सव मिरवणुक शांततेत व उत्साहात पडली.
ही घटना समजताच रावेर तहसीलदार बंडू कापसे नायब तहसीलदार संजय तायडे मंडळ अधिकारी रवी वानखेडे तसेच फैजपूर पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल बडगुजर यांनी निंभोरा येथे भेट दिली अशी माहिती निंभोरा पोलिसांनी दिली.
अफवांवर विश्वास ठेवू नये स.पो.नी हरिदास बोचरे*:-
*निंभोरा व परिसरातील ग्रामस्थांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सोशल मीडियावर कोणतीही चुकीची पोस्ट टाकू नये असे आवाहन केले*
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर तालुक्यातील शिक्षण क्षेत्र पुन्हा एकदा काळ्या छायेत सापडले आहे. शाळेशी संबंधित प्रशासकीय कामासाठी १५ हजार रुपयांच...
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला आज मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेवक हेमंत पाटी...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा