Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १३ ऑक्टोबर, २०२५

शिक्षणाधिकारी प्रवीन पाटीलसह उपशिक्षणाधिकारी, तत्कालीन अधीक्षक निलंबित



नाशिक प्रतिनिधी/ बनावट नियुक्ती आदेश दिल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलेले जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांच्यासह उपशिक्षणाधिकारी उदय देवरे व माजी अधीक्षक सुधीर पगार यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे.

मालेगाव येथील शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश दिल्याप्रकरणी या तीन अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. देवरेंना जामीन मिळाल्याची चर्चा असली तरी उर्वरित दोन्ही अधिकारी अजूनही अटकेत आहेत. त्यांच्या निलंबनाचे आदेश सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. परंतु, या अधिकाऱ्यांना

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ४८ तासांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव शासनाला दाखल केला होता. त्यानुसार तिघांचे निलंबन करण्यात आले असून त्याबाबतचे आदेश शिक्षण उपसंचालक कार्यालयास प्राप्त झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, प्रभारी शिक्षणाधिकारी म्हणून सरोज जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध