Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २ ऑक्टोबर, २०२५
Home
/
Unlabelled
/
निंभोरा येथे युवा प्रशिक्षणार्थी शिक्षकेचा निरोप समारंभात मुलांना झाले अश्रूअनावर..
निंभोरा येथे युवा प्रशिक्षणार्थी शिक्षकेचा निरोप समारंभात मुलांना झाले अश्रूअनावर..
निंभोरा बु: ता: रावेर येथील जिल्हा परिषद शाळा निंभोरा स्टेशन येथे दि.१ ऑक्टोबर २०२५ रोज बुधवार रोजी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी कु. मिनाक्षी विजयकुमार सोनार यांचा निरोप समारंभ व सत्कार सोहळा पार पडला.
यावेळी प्रशिक्षणार्थी शिक्षिका कु.मीनाक्षी सोनार व शालेय मुलांना अश्रूअनावर झाले. आपल्या वर्षभराच्या कार्यकाळात त्यांनी मुलांना नवनवीन अभ्यासक्रमाद्वारे विविध उपक्रम व खेळ शिकवत आपलेसे केले होते. या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसीम शेख होते. यावेळी कुमारी सोनार यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याबद्दल कौतुक केले व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर कार्यक्रमाला उपस्थित गौतम कुर्रे व दिलीप खैरे यांनी विद्यार्थ्यांवर दिलेले संस्कार व प्रेम सदैव स्मरणात राहतील असे गौरवउद्गार व्यक्त केले. मुख्याध्यापक विकास जनबंधू यांनी कु.मिनाक्षी सोनार यांच्या शैक्षणिक कामातील प्रामाणिकपणा व विविध उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा करता येईल यासाठी सतत असलेली जिद्द हे खूप कौतुकास्पद आहे. युवा प्रशिक्षणार्थी सहकार्याने केलेले कार्य आयुष्यभर स्मरणात राहील असे विचार व्यक्त केले . कु.मिनाक्षी सोनार आपल्या मनोगतात ही शाळा कायम माझ्या स्मरणात राहील व सर्वांनी मला उत्तम सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन उपशिक्षक सोमनाथ उघडे यांनी केले. यावेळी विद्यार्थी व पालकांसोबत व्यवस्थापन समितीचे सदस्य व रेखा महाले संगीता बिऱ्हाडे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या शेवटी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या विविध स्पर्धा व खेळांच्या स्पर्धेत प्राविण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा