Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०२५

सहस्त्रलिंग येथील शेत शिवारातून एक लाख सत्तर हजार रुपये किमतीचा गांजा जप्त.


रावेर प्रतिनिधी/भिमराव कोचुरे

रावेर तालुक्यातील सहस्त्रलिंग शेत शिवारात जळगाव गुन्हे शाखा व रावेर पोलिसांनी सुमारे एक लाख ७० हजार रुपयांचा २५ किलो गांजा जप्त केला या प्रकरणी एकास अटक केली.
सहस्त्रलिंग येथील शेती शिवारातील गट क्रमांक २३/१ मध्ये मेहरबान रहेमान तडवी (वय ३२) याने तुरीच्या शेतात मधोमध गांजांच्या पाच झाडांची लागवड केली होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून जळगाव गुन्हे शाखा, रावेर पोलिस व फैजपूर येथील फॉरेन्सिक पथकाने त्या शेतात छापा टाकला. पोलिसांनी एक लाख ७० हजार रुपयांचा २५.४५ किलो गांजा जप्त केला. याबाबत पोलिस

कर्मचारी बबन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिस ठाण्यात मेहरबान तडवीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर अधीक्षक अशोक नखाते, उपअधीक्षक अनिल बडगुजर, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे राहुल गायकवाड, रावेरचे निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली रावेरच्या सहायक निरीक्षक मीरा देशमुख, उपनिरीक्षक. मनोज महाजन, सोपान गोरे, हवालदार यशवंत टहाकळे, संदीप चव्हाण, ईश्वर चव्हाण, कर्मचारी प्रदीप सपकाळे, सचिन घुगे, मयूर निकम, राहुल परेदशी व इस्माईल तडवी यांनी ही कारवाई केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध