Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १२ ऑक्टोबर, २०२५

सुळे फाट्यावर दरोड्याच्या तयारीत चार जण अटक; दोन गावठी पिस्तुले, ११ काडतुसे व कार जप्त..!



शिरपूर प्रतिनिधी/ तालुका पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग वरील सुळे फाटा परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर मध्यरात्री छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत चार संशयितांना अटक करून त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुले, ११ जिवंत काडतुसे आणि एक कार असा एकूण ₹३,६१,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

"गोपनीय माहितीवरून कारवाई"

गोपनीय माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयपाल हिरे साहेबांनी खात्री करण्यासाठी पथक तयार करून कार्यवाहीसाठी पाठविले आंबे गाव परिसरातून माहिती मिळाली होती की काही गुन्हेगार महामार्गावर दरोड्याची तयारी करत आहेत. त्यानंतर पो/ मिलिंद पवार यांच्या नेतृत्वाखालील पथक सुळे फाटा परिसरात रवाना झाले.

"सुळे फाट्यावर सापळा रचला"

११ ऑक्टोबर रोजी रात्री ११.३० वाजता पोलिसांनी सुळे फाटा येथे सापळा रचला. यावेळी रोडच्या साईटला टियागो कार (MH-14 KW-8409) एस पोलिसांना दिसली. तपासणीदरम्यान मोटारसायकलवरील इसम दहीवद गावाच्या दिशेने पळून गेला. मात्र कारमधील चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

"अटक आरोपींची नावे"

1 प्रेम ऊर्फ सनी अनिरुद्ध चोपडे (वय २७, रा.रावेत, पुणे)

2 कृष्णा सुभाष सौराते (वय २०, रा. बिरदवडी, खेड, पुणे)

अंकुर रमेश कार्ले (वय २५, रा. चांदुस, खेड, पुणे)

4 अनिकेत सुरेश वाळुंज (वय २६, रा. चांदुस, खेड, पुणे) (एक अज्ञात मोटारसायकलस्वार फरार)

"मुद्देमाल जप्त..!"

संशयितांची व वाहनांची झडती घेण्यात आली. त्यात पुढील मुद्देमाल मिळून आलाः

दोन गावठी पिस्तुले (९ एमएम बोर, चांदी रंगाची)

११ जिवंत काडतुसे (पिवळ्या धातूची)

पांढऱ्या रंगाची टाटा टियागो कार (MH-14 KW-8409) एकूण किंमत - ₹३,६१,०००

"गुन्हा दाखल व पुढील तपास"

या प्रकरणी संबंधित कलमान्वये गुन्ह। नोदविण्यात आला अटक आरोपींना पोलिस ठाण्यात आणून पुढील तपास सुरू आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास मिलिंद पवार करीत आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध