Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २ ऑक्टोबर, २०२५

उटखेडा ते चिनावल रस्त्याच्या दुतर्फा असलेले गवत व काटे


रावेर प्रतिनिधी:-
रावेर तालुक्यातील उटखेडा ते चिनावल या सात किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात गवत व काटेरी झुडपे वाढले असून या गवत व झुडपांमुळे वळण रस्त्यावर समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.तसेच साईड पट्टी अभावी एकमेकांना साईड देण्यास जागा नसल्याने शाब्दिक चकमक होत असते.तसेच गवत मोठे झाले असून वाहन धारक साप विंचू यांच्या भीतीमुळे गवतामध्ये पाय ठेवण्यास धजावत नाही.याकडे संबंधित विभागाने त्वरित लक्ष देवून रस्त्यावरील गवत व काटेरी झुडपे जेसीबी द्वारे काढण्यात यावे अशी मागणी परिसरातील वाहनधारक करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध