Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ८ ऑक्टोबर, २०२५

शिरपूर- वरवाडे नगरपालिका प्रभाग आरक्षण सोडत जाहीर १३ ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन



शिरपूर (प्रतिनिधी) – शिरपूर- वरवाडे नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडत उपजिल्हाधिकारी महादेव खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सकाळी पार पडली. या सोडतीच्या माध्यमातून एकूण १६ प्रभागांमधून ३२ नगरसेवकांची निवड सदस्य पद्धतीनुसार करण्यात येणार आहे. या महत्त्वाच्या कार्यक्रमास नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव
या निवडणुकीत राज्य शासनाच्या धोरणानुसार ५० टक्के जागा महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर २ जागा अनुसूचित जातींसाठी व ३ जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा व वंचित घटकांचा सहभाग वाढणार असून लोकशाही प्रक्रियेला बळकटी मिळणार आहे.
आरक्षण यादी व हरकतींची अंतिम तारीख
सोडतीनंतर तयार झालेली प्रभाग रचना व आरक्षण यादी शिरपूर नगरपालिका तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिक, सामाजिक संस्था किंवा इच्छुकांनी या यादीवर १३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत हरकती व सूचना सादर कराव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्यानंतर अंतिम आरक्षण यादी जाहीर केली जाईल.
मतदारसंख्या व निवडणुकीचे स्वरूप
या निवडणुकीत एकूण ६५,७८९ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सदस्य पद्धतीनुसार प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे एकूण ३२ नगरसेवकांची निवड प्रक्रिया होणार असून स्थानिक राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला वेग दिला आहे.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या सोडत कार्यक्रमास शिरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत सरोदे, प्रशासकीय अधिकारी संजय हसवानी, नगरपालिका अधिकारी, विविध पक्षांपा कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते डॉ. प्रशांत सरोदे यांनी नागरिकांना वेळेत हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन केले आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध