Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २२ नोव्हेंबर, २०२५

घरपट्टीवर 50% सवलत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान चिमठाणे ग्रामपंचायतीत संपन्न....!



चिमठाणे परिसर -प्रतिनिधी प्रविण भोई 
ग्रामपंचायत आर्थिक स्वावलंबन समृद्ध गावांच्या निर्मितीसाठी शासनाच्या सर्व विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने राज्यात मुख्यमंत्री समृद्ध अभियान राबवण्यात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्याच उद्देशाने. ग्रामपंचायती यांच्या थकीत थकबाकीवरर वसुलीला गती देण्यासाठी थकबाकीच्या एक रकमे वसुली करिता आणि थकबाकीची वसूल केलेली रक्कम विकास प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी ग्रामपंचायतीकडून निवासी मालमत्ता करांच्या थकबाकी वसुलीत सवलत देण्याबाबत शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवले आहे. त्यात थकबाकीदारांना 50% घर पट्टीमध्ये सवलत देण्याच्या निर्णय शासनाने घेतला आहे. 

घरपट्टी सन २०२५ -२६ च्या पूर्ण करांची रक्कम +दिनांक ०१ एप्रिल २०२५ पूर्वीच्या कराची एकूण थकबाकी मिळून येणाऱ्या रकमेच्या ५० % रक्कम थकबाकी एक रक्कमी भरल्यास  त्यावर 50% सवलत मिळणार आहे. ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातील सदर सवलत केवळ निवासी मालमत्ताधारकांसाठी असून औद्योगिक वाणिज्य व इतर मालमत्ता साठी नाही असे ग्रामपंचायतीने नमूद केले आहे सदर घरपट्टी भरावया ची याची मुदत ३१ डिसेंबर २०२५ नमूद केली आहे .सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी सौं. छोट्याबाई दरबारसिंग गिरासे ( लोकनियुक्त सरपंच चिमठाणे ), सुरतसिंग भखतसिंग गिरासे, अरविंद कासार (ग्रा. सदस्य ),यशवंत धनगर (ग्रा. सदस्य ), हरिष नगराळे (ग्रा. सदस्य ), सुभाष भिल (ग्रा. सदस्य ), कैलास माळी(रोजगारसेवक ),विक्की बर्डे, भूषण गिरासे, महारू अप्पा गिरासे,बंटी नगराळे  (ग्रामस्थ ) दरबारसिंग गिरासे (मा. सभापती ) आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध