Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २२ नोव्हेंबर, २०२५
शहर विकास आघाडी तर्फे अखेर जितुभाऊ ठाकूर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले
अमळनेर प्रतिनीधी:- आगामी नगराध्यक्ष निवडणुकीत शहर विकास आघाडी तर्फे अखेर जितुभाऊ ठाकूर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. उमेदवारीची घोषणा होताच शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यकर्त्यांनी आतषबाजी करत जल्लोष केला.
सर्वसामान्यांच्या समस्या ओळखणारा उमेदवार सामाजिक क्षेत्रात सक्रिय राहून अनेक वर्षे लोकांच्या अडचणींशी प्रत्यक्ष काम केलेल्या व्यक्ती म्हणून जितुभाऊ ठाकूर यांची ओळख आहे. त्यांच्या या सर्वसमावेशक आणि जनसंपर्कातील अनुभवामुळेच त्यांच्यावर विश्वास व्यक्त केल्याचे सूत्रांकडून समजते. स्थानिक नागरिकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, "जितुभाऊंची उमेदवारी म्हणजे आमच्यासारख्या सर्वसामान्यांसाठी आश्वासक पाऊल. आमच्या समस्या त्यांनी जवळून अनुभवल्या आहेत."
अनिल पाटील यांचेही अभिनंदन
उमेदवारी जाहीर होताच शहरातील नागरिकांनी आमदार अनिल पाटील यांचेही अभिनंदन केले. अनेक कार्यकर्त्यांनी पाटील यांच्या निवासस्थानी तसेच निवडणूक कार्यालयात भेट देत शुभेच्छांचा वर्षाव केला. कार्यकर्ते म्हणाले, "ज्यांची काम करण्याची शैली दमदार आहे अशा उमेदवाराचीच आज अमळनेरला आवश्यकता होती."
नगरपरिषदेला विकासाचा नवा अध्याय?
अलीकडच्या काळात नगरपरिषदेच्या विविध कामांमध्ये गती नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून व्यक्त होत होत्या. अशावेळी जितुभाऊ ठाकूर यांच्या नावाची घोषणा होताच शहरभर "अमळनेरला आता विकासाचा नवा मार्ग मिळणार" अशी चर्चा सुरू झाली आहे.
पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, नागरिक सुविधा, बाजार व्यवस्थापन या महत्त्वाच्या प्रश्नांवर ठोस पावले उचलली जातील अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली.
निवडणूक प्रचाराचे समीकरण आता रंगणार शहर विकास आघाडी तर्फे उमेदवार जाहीर केल्याने आता इतर पक्ष कोणाला मैदानात आणणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहरातील राजकीय वातावरणही रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी - वरवाडे नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत युवा नेतृत्वाचा चे...
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा